मुंबई – सोशल माध्यमे हे अतिशय शक्तीशाली माध्यम असल्याने त्यावर बनावट मेसेज क्षणार्धात प्रचंड व्हायरल होतात. आताही टाटा ग्रुपचा एक मेसेज सध्या व्हॉटसअॅपवर धुमाकूळ घालत आहे. त्यात म्हटले आहे की, टाटा ग्रुपला १५० वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त खालील लिंकवर क्लिक करा आणि कार जिंका. हा मेसेज खरा आहे की खोटा याचा खुलासा झाला आहे. खुद्द टाटा ग्रुपनेच या मेसेजची दखल घेतली आहे. ग्रुपने म्हटले आहे की हा मेसेज अत्यंत फसवा आहे. टाटा ग्रुपना असा कुठलाही मेसेज तयार केलेला नाही किंवा पाठविलेलाही. सायबर क्राईम करणाऱ्यांनी हा मेसेज व्हायरल केला आहे. त्यामुळे अशा फसव्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन मुंबई सायबर क्राईम पोलिसांनी केले आहे. तसेच, या मेसेजमध्ये दिलेली लिंक चुकूनही उघडू नये, असेही पोलिसांनी बजावले आहे. मोफत कार जिंकण्याच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी ही लिंक उघडली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. टाटा ग्रुपने केलेला खुलासा असा
https://twitter.com/TataCompanies/status/1443813902131728384