मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची विक्री वाढली आहे. विशेषत: ब्राण्डेड दागिन्यांना विशेष मागणी दिसून येत आहे. सध्या मार्केटमध्ये असलेले ब्राण्ड्स आर्थिक नफा अनुभवत असताना त्यांना आव्हान देण्यास आदित्य बिर्ला सज्ज आहे. बिर्ला समूह आता ब्राण्डेड दागिन्यांच्या क्षेत्रात उतरणार असून त्यांचे सर्वांत मोठे आव्हान टाटा समूहाच्या तनिष्क या ब्राण्डपुढे राहणार आहे.
डेड इन्व्हेस्टमेंट अशी ओळख असलेल्या सोन्याची मागणी काही कमी झालेली नाही. विशेषत: भारतीयांना सोने आणि सोन्याचे दागिने खरेदी करण्याची विशेष हौस आहे. त्यामुळेच मागील दहा ते पंधरा वर्षांत पारंपरिक सराफा व्यापाऱ्यांशिवाय देशातील मोठ्या उद्योग समुहांनी ब्राण्डेड ज्वेलरीच्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.
आदित्य बिर्ला समूह ब्राण्डेड दागिन्यांच्या रिटेल व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. यासाठी समूह जवळपास ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नॉव्हेल ज्वेल्स नावाच्या नवीन व्हेन्चर अंतर्गत हा व्यवसाय केला जाणार असल्याचे समूहाकडून जाहीर करण्यात आले आहेय. बिर्ला समूह आपल्या इन-हाउस बँडसह संपूर्ण भारतात लार्ज फॉरमॅट ज्वेलरी रिटेल स्टोअर्स स्थापन करणार आहे. पेंट्स आणि बिल्डिंग मटेरियलसाठी बीटूबी ई-कॉमर्सनंतर गेल्या दोन वर्षात ग्रुपची ही तिसरी नवी बिझनेस एन्ट्री आहे.
तनिष्क, कल्याणशी थेट स्पर्धा
बिर्ला समूहाच्या ब्राण्डेड ज्वेलरी रिटेल उपक्रमाचे नेतृत्व नव्याने नियुक्त केलेल्या लीडरशीप टीमकडून केले जाईल. त्यांच्याकडे उत्तम रिटेल आणि कॅटरेगरी एक्सपर्टीज असतील. फायबरपासून फायनॅन्शिअल सेवांपर्यंतच्या व्यवसायात गुंतलेल्या या समूहाला दागिन्यांमध्ये राष्ट्रीय ब्रँड तयार करायचा आहे. समूहाचा ब्रँड टाटांच्या तनिष्क, कल्याण ज्वेलर्स आणि जो आलुक्कास यांसारख्या विद्यमान प्रस्थापित कंपन्यांशी स्पर्धा करेल.
Tata Birla Business Gold Jewelery Investment