इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यातील वाद हे सर्वश्रुत आहेत. या दोघांचा लवकरच घटस्फोट होणार आहे. या दोघांच्या नात्यात कडवटपणा आला असला तरी ते दोघे मिळून मुलांची काळजी घेतात. त्यानंतर आलिया तिच्या आयुष्यात पुढे गेली असून तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामुळे तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आल्याची चर्चा आहे.
मला आनंदात राहण्याचा अधिकार नाही का?
सिद्दीकीपासून विभक्त होण्याआधीच आलियानं आयुष्यात दुसरं प्रेम आलं आहे. आलियानं इन्स्टाग्रामवर तिच्या नवीन पार्टनरचा फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. आलियानं तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने एक पोस्ट केली आहे. ‘जे नातं मी स्वीकारलं होतं त्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी मला १८ वर्षे लागली. असे असले तरी आजही माझ्या आयुष्यात मुलं ही सर्वात आधी आहेत आणि कायम रहातील. परंतु काही नाती अशी असतात जी मैत्रीपैक्षा जास्त महत्त्वाची असतात. आणि माझ्या आयुष्यात आलेलं हे नातं असंच महत्त्वाचं आहे. या नात्यामुळे मी खूप आनंदी आहे. त्यामुळे माझा हा आनंद सर्वांबरोबर वाटत आहे. मला आनंदात राहण्याचा अधिकार नाही का?’ असा सवालही तिने केला आहे.
आलियाच्या आयुष्यात आलं प्रेम?
आलियानं याबाबत एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, ‘मी आता आयुष्यात पुढं गेले आहे. माझ्या त्याच्याशी असलेलं हे नातं मैत्रीपेक्षा अधिक आहे. मात्र, आमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची कमिटमेंट नाही. मला माझं आयुष्य जगायचं आहे. माझं आयुष्य मुलांबरोबर घालवायचं आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही. परंतु आम्हा दोघांमधील नातं अत्यंत सन्मानाचं आहे.’ आलियानं तिच्या आयुष्यात आलेल्या त्या अनोळखी व्यक्तीबद्दलही सांगितलं आहे. तो अतिशय सज्जन व्यक्ती असून माझा आदरही करतो. तो भारतामधील नाही तर इटलीचा आहे. आम्ही दोघं दुबईत भेटलो. तो माझा आदर करतो आणि माझी खूप काळजी घेतो.’
नवाजुद्दीन आणि आलियामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते, परंतु परस्पर संमतीनंतर अभिनेत्याने आलियावरील मानहानीचा खटलाही मागे घेतला असून सध्या दोघेही आपले वैयक्तिक आयुष्य जगत आहेत. आलिया सध्या दुबईत असून, नवाजुद्दीन त्याच्या ‘जोगिरा सारा रा रा रा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
https://www.instagram.com/p/CtGm2eSyEPb/?utm_source=ig_embed&ig_rid=343620e6-9a59-4735-ade5-55fb6b17109e
Nawazuddin Siddiqui wife Alia Love