विशेष प्रतिनिधी, मुंबई
गेली अनेक वर्षे रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील कलाकारांना किती मानधन मिळत असेल, याचा तुम्हाला काही अंदाज आहे? लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या शो मधील कलाकारांना मेहेनताना देखील चांगलाच मिळतो. त्यातही जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी आघाडीवर आहेत. यापूर्वी दिलीप जोशी यांची पत्नी दयाबेन म्हणजेच दिशा वकानी हिला सर्वाधिक मानधन मिळत असल्याची चर्चा होती.
एका भागासाठी त्यांना तब्बल दीड लाख दिले जातात. ते या कार्यक्रमातील सर्वात महागडे अभिनेते आहेत. त्यांच्याखालोखाल नंबर लागतो तो तारक मेहता अर्थात शैलेश लोढा यांचा. त्यांना प्रति भाग १ लाख मानधन मिळते. तर आत्माराम तुकाराम भिडे म्हणजे मंदार चंदावकर यांना ८० हजार तर सगळ्यांची लाडकी बबिता म्हणजेच मुनमून दत्ता हिला ५० हजार मिळतात.
दिलीप जोशी हे त्यांचा कॉमेडी सेन्स आणि टायमिंगसाठी ओळखले जातात. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शो मध्ये तारक मेहता कार्यक्रमाचे निर्माते असीम मोदी यांनी याबद्दल सांगितले होते. दिलीप जोशी हे आमचे ओपनिंग बॉलर, बॅट्समन, शो चे कॅप्टन असे सारे काही आहेत. तर टीआरपी बद्दल ते म्हणाले की, आजही लोकांना हा कार्यक्रम फार आवडतो. त्यामुळेच याचा रिपीट टेलिकास्टही लोक आवडीने पाहतात.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ हा कार्यक्रम गेली १३ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे रोजच्या जगण्यातल्या गोष्टी यात हलक्या फुलक्या पद्धतीने मांडल्या जातात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा कार्यक्रम आपण कुटुंबियांसोबत बसून बघू शकतो. हेच याचे सर्वात मोठे यश आहे.