मुंबई – तारक मेहता का उलटा चष्मा या प्रसिद्ध मालिकेत बबिताची भूमिका निभावणारी मुनमुन दत्ता हिला कोण ओळखत नाही? बबिता जी आणि जेठालाल यांच्यातील दाखविल्या जाणार्या संवादात सोशल मीडियावर अनेक मीम्स तयार केले जातात. बबिता जीच्या व्यक्तीरेखेत मुनमुन दत्ताच्या अभियनाला चांगलीच पसंती मिळाली आहे. तारक मेहता या मालिकेला सुरुवात झाल्यापासून मुनमुन दत्ता या मालिकेत काम करत आहे. परंतु ती सध्या मालिकेच्या सेटवर दिसत नसल्याने तिच्याबद्दल अफवा पसरल्या आहेत.
चित्रीकरणाकडे पाठ
गेल्या काही दिवसांपासून मुनमुन दत्ताने मालिका सोडल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तारक मेहताच्या याआधीच्या मालिकेत मुनमुन दिसली नाही, असे कधीही घडले नाही. परंतु मिशन काला कौवा या भागाच्या ती चित्रीकरणाला उपस्थित नव्हती. काही दिवसांपूर्वी तिने वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे तिने मालिका सोडल्याच्या अफवा पसरल्या होत्या.
दमणमध्ये चित्रीकरण
कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रात चित्रीकरणाला बंदी घातली होती. त्यादरम्यान संपूर्ण क्रू दमन येथे हलविण्यात आले होते. त्याच ठिकाणी चित्रीकरण झालेल्या मिशन कौवा या भागात मुनमुन दत्ता दिसली नाही. तिने मालिका सोडल्याचा अंदाज तेव्हापासून लावला जात आहे.
मुनमुन परतली नाही
तारक मेहताचे संपूर्ण पथक मुंबईला परतले आहे. परंतु अजूनही मुनमुन दत्ता चित्रीकरणासाठी आलेली नाही, असे एका स्पॉटबॉयकडून समजते. यादरम्यान परंतु तिने मालिका सोडलेली नाही, असे निर्मात्या कंपनीने म्हटले आहे.
वादात अडकली मुनमुन
मुनमुन दत्ता काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आली होती. तिने सोशल मीडियावर भंगी या जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर तिच्याविरुद्ध हरियाणा पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. याच प्रकरणानंतर ती मालिकेच्या सेटवर दिसलीच नाही.
निर्मात्यांकडून अफवांचे खंडन
मुनमुन दत्ता अजूनही तारक मेहता मालिकेत आहे, असे मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी स्पष्ट केले आहे. मुनमुनबद्दल बातम्या अफवा असून, पूर्णपणे निराधार आहे, असेही मोदी यांनी सांगितले.