मुंबई – शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या अडचणी आता चांगल्याच वाढल्या आहेत. साध्या भोळ्या चेहऱ्याचा उद्योजक म्हणून स्वतःची ओळख तयार करणारा कुंद्रा पडद्यामागे अश्लील व्यापार करीत होता, हे कुणालाच कळले नाही. आता मुंबई पोलिसांनी तपास सुरू केल्यावर अॉडीशनच्या नावाने राज कुंद्रा पॉर्न फिल्म्स तयार करायचा, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
प्रलोभन देऊन मुलींना अॉडिशनसाठी बोलवायचे आणि नंतर त्यांना अश्लील सीन देण्यास भाग पाडणे असा प्रकार चालायचा. अनेक नवोदित नट्या वेबसिरीज किंवा शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याच्या नादात या रॅकेटमध्ये अडकल्या होत्या. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अभिनेत्री व मॉडेल सागरिका सोना सुमन हिचा एक व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ज्यात तिने आपल्यालादेखील अश्लील सीन देण्याची आफर मिळाली होती, पण आपण ती नाकारली असा खुलासा केला आहे. दुसरीकडे अभिनेत्री शर्लीन चोप्रा आणि पुनम पांडे यांनी पोलिसांकडे आपले बयाण पहिलेच नोंदविले आहे. या रॅकेटमध्ये अडकलेल्या काही मुली पहिलेच पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानंतर याव्यवसायात असलेल्या काही निर्मात्यांची नावेसुद्धा पुढे आली आहेत.
राज कुंद्रा या व्यवसायातून करोडो रुपये कमत असताना या अभिनेत्रींना मात्र 8 ते 10 हजार रुपये मिळायचे. वियानी कंपनीचा प्रमुख उमेश कामत याला सर्वात पहिले अटक करण्यात आली. त्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर राज कुंद्रालाही अटक करण्यात आली आहे.
दररोज 2 लाखांची कमाई
राज कुंद्राच्या अटकेनंतर एक व्हॉट्सएप चॅप उघडकीस आले आहे, ज्यातून या व्यवसायात दररोज 2 लाख रुपयांची कमाई व्हायची, अशी माहिती मिळाली आहे. लाईव्ह शोच्या माध्यमातून 2 लाख आणि चित्रपटांच्या माध्यमातून 4.53 लाख रुपये कुंद्रा कमवायचा.