इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कॅथलिक मिशनरी नसते तर तामिळनाडू हे दुसरे बिहार बनले असते, असा दावा तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष एम अप्पावू यांनी केला आहे. त्यांच्या दाव्याने तथा वादग्रस्त वक्तव्याने राज्यात वादाला तोंड फुटले आहे. राज्याच्या विकासाचे श्रेय त्यांनी कॅथलिक मिशनऱ्यांना दिले आणि त्यांच्यामुळेच आजच्या काळात तामिळनाडूचा विकास झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. भाजपसह अन्य पक्षांनी याविरोधात जोरदार आवाज उठविला आहे.
अप्पावू यांच्या वक्तव्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. त्यांच्या वक्तव्याला ‘जातीयवादी वक्तव्य’ म्हणत भाजपने माफी मागण्याची धमकी दिली आहे. भाजपचे प्रवक्ते मोहन कृष्णा म्हणाले की, तामिळनाडूच्या सभापतींनी माफी मागावी. भाजप नेत्याने तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, द्रमुकची मानसिकता हिंदूविरोधी आहे.
तर दुसरीकडे कॅथलिक मिशनरींनी आपले जीवन घडवले असा दावाही स्पीकर अप्पावू यांनी केला. सध्याचे सरकार कॅथलिक नागरिकांचे आहे, ते उपवास करतात आणि देवाला प्रार्थना करतात. सभापती म्हणाले, हे सरकार तुमच्या सर्वांनी मिळून बनवले आहे हे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना माहीत आहे. तामिळनाडूमध्ये ख्रिश्चन समाजाच्या संस्था नसतील तर त्याची अवस्था बिहारसारखी होईल, असेही ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावर गदारोळ झाल्यानंतर सभापती अप्पावू म्हणाले की, ते फक्त इतिहासाचा संदर्भ देत आहेत.
राज्यातील शिक्षणाच्या प्रसारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि समाजात समानता आणली. त्यांचे कार्य द्रविड चळवळीचा विस्तार आहे. आपल्या शिक्षणाचे श्रेयही त्यांनी मिशनऱ्यांना दिले. तर भाजपचे प्रवक्ते मोहन कृष्णा यांनी स्पीकर अप्पावू यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली, द्रमुक सत्तेत आल्यापासून नेहमीच वादात सापडला आहे. या सरकारचा अजेंडा तामिळनाडूतील हिंदूंना अपमानित करणे आणि राज्यात हिंदुविरोधी प्रचार करणे हा आहे, असाही आरोप त्यांनी केला.
Tamil Nadu Speaker Controversial Statement on Catholic Missionaries