इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या कन्याकुमारी ते काश्मीर अशा ‘भारत जोडो’ यात्रेवर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आज चौथा दिवस आहे. तत्पूर्वी शनिवारी दुपारी त्यांनी कन्याकुमारी येथील मार्तंडम येथे मनरेगा महिला कामगारांची भेट घेतली. याच भेटीतील एक वेगळाच किस्सा आता समोर आला आहे. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी सांगितले आहे की, या महिलांनी राहुल यांच्याशी लग्नाशी संबंधित संवाद साधला. यावेळी एका महिलेने चक्क प्रस्ताव दिला की, राहुल गांधींचे तामिळनाडूवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी “तमिळ मुलीशी लग्न” करावे.
जयराम रमेश म्हणाले की, राहुल हे महिलांसोबतच्या संभाषणात खूप आनंदी दिसत होते. बेरोजगारी आणि महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसने ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून भारत जोडी यात्रा सुरू केली आणि शनिवारी तामिळनाडूची यात्रा पूर्ण केली. यादरम्यान राहुल गांधी स्थानिक लोकांच्या भेटी घेत आहेत. त्यांनी महिला मनरेगा कामगारांशीही संवाद साधला.
आशियातील पहिली महिला बस चालक ६३ वर्षीय वसंताकुमारी यांचीही राहुल गांधी यांनी भेट घेतली. मार्तंडममधील स्वच्छता कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. राहुल गांधी त्यांच्या तामिळनाडू दौऱ्याच्या शेवटी केरळच्या सीमेजवळ एका चहाच्या स्टॉलच्या मालकाशी बोलत आहेत. आज सकाळी केरळमध्ये यात्रेचा चौथा दिवस सुरू झाला आहे.
भारत जोडो यात्रेबाबत गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. भारत एकसंध असल्याने या यात्रेची गरज काय असा सवाल आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह भाजप नेत्यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींच्या ‘विदेशी बनावटीच्या टी-शर्ट’वर भाष्य केले. शहा म्हणाले की, “भारत हे राष्ट्र नाही असे सांगणारा आता परदेशी टी-शर्ट घालून भारताला जोडण्याच्या प्रवासावर आहे.”
https://twitter.com/Jairam_Ramesh/status/1568561940540321793?s=20&t=UYaoPHtQMiOZsHtoPLSjTw
Tamil Women Marriage Offer to Rahul Gandhi
Bharat Jodo Yatra Congress Politics