इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मीना सागर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. काहीच दिवसांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. त्यांना फुफ्फुसाचा आजार होता. त्यासाठी त्यांनी दात्याची वाट पाहिली, मात्र डोनर मिळाला नाही. परिणामी, सागर यांची तब्येत खालावत जाऊन त्याचे निधन झाले. पतीच्या मृत्यूनंतर मीना यांनी अवयव दानाचा निर्णय घेतला आहे.
जीवन वाचवणे यापेक्षा कोणतेही मोठे कार्य नाही, अवयव दान हे जीवन वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग असून एक व्यक्ती अवयवदानाने आठ लोकांचे प्राण वाचवू शकते. जे दुःख मी सहन केले ते दुसऱ्या कुणाच्या नशिबाला येऊ नये असे म्हणत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
अभिनेत्री मीना पुढे म्हणाली की, अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. माझ्या सागरला डोनर मिळाले असते तर आज माझे आयुष्य वेगळे असते. त्यातूनच बोध घेऊन मी हा निर्णय घेतला आहे.
जगात सर्वांनी असा निर्णय घेतला तर अनेकांचे प्राण वाचतील. प्रत्येक नागरिकाला अवयव दानाचे महत्त्व समजणे गरजेचे आहे. आज मी अवयव दानाची शपथ घेतली आहे. या सगळ्याचा आपल्या ओळखीच्या लोकांवर मोठा परिणाम होतो. त्यासाठी मी ही सुरवात केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Tamil Actress Meena Big Decision After Husband Death
Entertainment