India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तलाठी बदल्यांबाबत मंत्रालयात झाला हा निर्णय

India Darpan by India Darpan
June 30, 2021
in संमिश्र वार्ता
0

मुंबई – तलाठी संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्यांना दि. 15 मे, 2019 च्या शासन निर्णयातून वगळण्याबाबत महसूल विभागाने सविस्तर प्रस्ताव करून सामान्य प्रशासन विभागाला पाठवावा तसेच या प्रस्तावावर सामान्य प्रशासन विभागाने सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
तलाठी संवर्गाच्या बदल्यांबाबतच्या समस्यांविषयी श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव श्रीमती गीता कुलकर्णी, अवर सचिव दि. बा. मोरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शासकीय कर्मचाऱ्याच्या विनंतीनुसार संवर्गाअंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशनाबाबतचा शासन निर्णय दि. 15 मे, 2019 रोजी जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयात जिल्हा अंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर बदलीने कायमस्वरूपी समावेशन करता येणार नाही अशी तरतूद आहे. त्यामुळे तलाठी संवर्गाची विनंती बदली जिल्ह्यातल्या जिल्ह्यात एका उपविभागीय अधिकाऱ्याच्या आस्थापनेवरून दुसऱ्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या आस्थापनेवर होत नाही. या कारणाने न्याय मिळत नसल्याची भावना तलाठी महासंघाने राज्यमंत्री श्री. भरणे यांच्याकडे व्यक्त केली. त्याची तात्काळ दखल घेऊन या शासन निर्णयातून तलाठी संवर्गाला वगळण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश श्री. भरणे यांनी दिले.


Previous Post

टीसीएलद्वारे मिनी एलईडी आणि क्यूएलईडी ‘सी सीरीज’ लॉन्च

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत असे आहे विविध कार्यक्रम

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत असे आहे विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘अशी सत्ता पसंत नाही’; महाराष्ट्रातील राजकीय नाट्यात अटल बिहारींचे भाषण व्हायरल

June 25, 2022

निलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदी ३ वर्षे पूर्ण; त्यांच्या कारकिर्दीचा हा आढावा…

June 25, 2022

क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याच्या नियमात येत्या १ जुलैपासून बदल; जाणून घ्या सविस्तर

June 25, 2022

आता भारतातच होणार वाहनांचे क्रॅश टेस्टिंग; सेफ्टी रेटिंगही मिळणार

June 25, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे आदेश

June 25, 2022
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

मंगलाष्टकावेळी वधू-वरामध्ये कडाक्याचे भांडण; नंतर पुढं हे सगळं घडलं

June 25, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group