मुंबई – टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. सेमिफायनलमध्ये कोणते संघ जातील, हे आज स्पष्ट झाले आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात आज सामना होता. त्यात न्यूझीलंडने ८ गड्यांनी विज मिळविला आहे. त्यामुळे न्यूझीलंडने सेमिफायनचे तिकीट निश्चित केले. परिणामी, भारत आता स्पर्धेबाहेर गेला आहे.
सेमिफायनलमध्ये आता पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ पोहचले आहेत. आता येत्या १० नोव्हेंबर रोजी सेमिफायनलचा पहिला सामना होईल. तर, दुसरा सामना ११ नोव्हेंबरला होईल. सेमिफायनल मधील विजेते थेट फायनल लढतीत एकमेकाला भिडणार आहेत. भारतीय संघाने पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या विरुद्धचे दोन्ही सामने गमावले. त्यानंतर स्कॉटलंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांवर विजय मिळविला आहे. अद्यापही भारताचा एक सामना बाकी असला तरी भारताचे गुण कमी आहेत. न्यूझीलंडचे गुण हे भारतापेक्षा अधिक झाल्याने भारत स्पर्धेबाहेर गेला आहे.
https://twitter.com/ICC/status/1457333365695135750