बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सुरगाणा – आमझर येथे तेरा बक-यांचा वाघाने पाडला फडशा, पशुपालक हवालदिल

by India Darpan
जुलै 6, 2021 | 5:33 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210706 WA0089 e1625592775958

सुरगाणा – तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आमझर येथील पशुपालक चिंतामण गंगाजी वाघमारे वय ४७ या इसमाच्या तेरा बक-यांवर वाघाने हल्ला करुन नरडीचा घोट घेऊन मारून टाकल्या. या बाबत समजलेले वृत असे की,रविवार (दि.४) रोजी आमझर गावात आदिवासी पारंपरिक  पद्धतीने रानभाजी तेरा खाण्याचा सण होता.  त्यामुळे पशुपालकाने  जंगलात चारण्याकरीता घेतलेल्या पंधरा ते वीस बक-या जंगलात सोडून तो सण असल्याने निघून आला. नेहमी  प्रमाणे  अंधार पडला की बक-या जंगलातून घराकडे परतायच्या मात्र शेतातील झापावर बक-या परतल्याच नाहीत. तेरा बक-या जंगलातील भोवर हेदीचा दरा येथेच राहिल्या याच द-यात  खडकाची कपार असल्याने
 वाघाचा(आदिवासी  बोलीत टेंभुरुण्या खड्या)चा अधिवास असतो. रात्रीच्या  सुमारास  बक-यांच्या कळपावर अचानकपणे हल्ला चढवून नरडीचा घोट घेत मारुन टाकल्या. यापैकी  अकरा बक-या ह्या एका जागेवर मृतावस्थेत आढळून आल्या तर दोन बक-यांचा अजूनही तपास लागलेला नाही. शेतक-याचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे.
हा भाग गुजरात राज्याचा सिमावर्ती भागा लगतचा राखीव जंगलाचा आहे. त्यामुळे अशा घटना पावसाळ्यात नेहमीच घडत असतात.काही दिवसापुर्वी याच शेतक-याचा गायीचा गो-हाचा फडशा पाडला होता. सदर घटनेचा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी  देवेंद्र  ढुमसे  यांनी  घटना स्थळी भेट देऊन  पाहणी  केली असून पंचनामा  करण्यात  आला आहे.  तर पशुवैद्यकीय अधिकारी  डॉ.ललिता नाळे यांनी   शवविच्छेदन केले असून अहवाल वनविभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वनविभागाने  वाघाचा बंदोबस्त  करावा अशी मागणी  ग्रामस्थांनी केली आहे.
आमजर येथील ज्येष्ठ नागरिक  परशराम भोये यांनी सांगितले की. वाघ बक-या सोबत ‘ससुली’  हा खेळ  खेळत  असतो त्यावेळी  जेवढ्या बक-या तावडीत सापडल्या तेवढ्या फक्त  मारून टाकतो.  काहीचे फक्त रक्त  पित असतो. त्या पैकी एक ते दोनच खातो. शिकारीचे कौशल्य विकसित  करण्याची संधी वाघाला मिळते त्यालाच आदिवासी  बोलीत ससुली खेळणे असे म्हटले जाते. लहान मुले पण आदिवासी भागात वाघ बकरीचा खेळ म्हणून ससुली खेळ  खेळत असतात.  या भागात तरस आढळून  येतो त्याला आदिवासी  भाषेत पडगांड्या किंवा गदड्या म्हणतात. दुसरी जात कुतर खाया म्हणजे  कुत्रे, कोंबडी यांची  करतो तर मोठ्या वाघाला टेंभुरुण्या  असे म्हणतात  तो बक-या, गाय, म्हैस, गायीचे गो-हे यांची शिकार  करतो.  दुसरी जात मांज-या आहे.  या जाती या भागात  आढळून  येतात.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

समाजकल्याण ‘शिष्यवृत्ती’धारक विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश..देशातील ‘टॉप २०’ उद्योन्मुख ‘स्टार्टअप’ मध्ये निवड.

Next Post

नाशिक – गावठी पिस्तोल आणि तीन जीवंत काडतुसे दडवून ठेवणाऱ्या पोलीसांनी केले गजाआड

India Darpan

Next Post
crime diary 1

नाशिक - गावठी पिस्तोल आणि तीन जीवंत काडतुसे दडवून ठेवणाऱ्या पोलीसांनी केले गजाआड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011