सोमवार, ऑक्टोबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सूरतमध्ये सापडल्या दोन हजाराच्या खोट्या नोटांचा साठा; नावातील या बदलामुळे झाले उघड

सप्टेंबर 30, 2022 | 2:05 pm
in संमिश्र वार्ता
0
Fd4k6b3VEAA7urx e1664526774494

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातमधील सुरत शहरात पोलिसांना खोट्या नोटांचा साठा सापडला आहे. हा साठा जप्त करण्यात आला असून, कामरेज पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. खबऱ्यांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत दोन हजार रुपयांच्या चलनी नोटांचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या चलनी नोटांचे मूल्य २५ कोटी ८० लाख रुपये इतके असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई-अहमदाबाद मार्गावरुन मोठ्या प्रमाणात चलनी नोटा नेल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या मार्गावरुन जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला चेकपोस्टवर अडवलं आणि तपासणी केली. या रुग्णवाहिकेमध्ये चलनी नोटांच्या सहा मोठ्या पेट्या पोलिसांना आढळून आल्या. विशेष म्हणजे या नोटा चलनी असल्याचे एका छोट्याशा चुकीमुळे पोलिसांच्या लक्षात आलं आहे ही कारवाई करण्यात आली. गुजरात पोलीस दलातील ग्रामीण विभागाचे अधिक्षक हितेश जोसर यांनी एएनआय वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे. रुग्णवाहिकेच्या मागील बाजूस ठेवलेल्या सहा कंटेनरमध्ये १ हजार २९० पाकिटांमध्ये दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा पोलिसांना सापडल्या. या नोटांचे चलनी मूल्य हे २५ कोटी ८० लाख इतकं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या नोटांवर रिझर्व्ह बँक असे लिहिण्याऐवजी रिव्हर्स बँक असे छापण्यात आले होते. या नोटा जवळून पाहिल्यानंतर हा महत्त्वाचा फरक दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बँकेचे अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमला या नोटांची तपासणी करण्यासाठी पाचारण करण्यात आलं. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. या नोटांवर ‘मुव्ही शुटींग पर्पज’ असंही लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे या नोटा चित्रिकरणासाठी नेमक्या कोणी छापल्या, यासंदर्भातील परवानगी घेण्यात आली होती का, या नोटा कोणाकडून छापून कुठे पाठवण्यात येत होत्या, त्यांचा वापर नेमका कुठे केला जाणार होता, यासारख्या प्रश्नांचा सध्या शोध घेतला जात आहे.

Surat 2 Thousand Fake Notes Found Name Change

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित; शिवसैनिकांना भावनिक साद (व्हिडिओ)

Next Post

‘आमच्यात आता बहिण-भावाचं नातं राहिलेलं नाही!’, धनंजय मुंडे यांचे पंकजा मुंडे यांच्याविषयी मोठे विधान

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
dhananjay and pankaja munde

'आमच्यात आता बहिण-भावाचं नातं राहिलेलं नाही!', धनंजय मुंडे यांचे पंकजा मुंडे यांच्याविषयी मोठे विधान

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011