India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘आमच्यात आता बहिण-भावाचं नातं राहिलेलं नाही!’, धनंजय मुंडे यांचे पंकजा मुंडे यांच्याविषयी मोठे विधान

India Darpan by India Darpan
September 30, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि आमच्यात आता बहिण – भाऊ म्हणून नातं उरलेलं नाही, राजकारणामध्ये आम्ही एकमेकांचे वैरी आहोत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बहिण – भावातील सध्याच्या नात्यावर भाष्य केले आहे. त्यांच्यातील भाऊ – बहिणीचं नातं संपलं असल्याची कबुलीच त्यांनी दिली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, पंकजा मुंडे आणि आमच्यात पूर्वी नातेसंबंध होते. नात्यातून आमच्यात राजकारणामध्ये वैर निर्माण झाले. त्यामुळे कुणाच्या वक्तव्यामुळे, वागण्यामुळे त्याचे काय परिणाम होतात, हे ज्यांनी त्यांनी आत्मपरिक्षण करावे. अशा पद्धतीची वक्तव्ये त्यांच्याकडून (पंकजा मुंडे) वारंवार येत आाहेत. ती बरोबर की चुकीची आहेत, याचे ज्यांनी त्यांनी आकलन करून त्या पद्धतीने मांडणी करावी, असा सल्लाही त्यांनी या वेळी बोलताना दिला. जनता जर माझ्या पाठीशी असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही माझा पराभव करू शकत नाहीत, असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नात्याविषयीची प्रतिक्रिया दिली. याबरोबरच भगवान गडाच्या दसऱ्याची परंपरा ही संतश्रेष्ठ भगवानबाबांनी सुरु केली होती. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी ती परंपरा सुरु ठेवली. आता या मेळाव्याला कोणाला बोलवायचं, केंद्रीय मंत्र्यांना आमंत्रण का दिले जात नाही हे पंकजा मुंडेंना विचारले पाहिजे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण-भावामधील राजकीय वाद महाराष्ट्राला नवीन नाही. या दोघांमधून विस्तव जात नाही. संधी मिळेल त्यावेळी हे दोघे एकमेकांवर तोंडसुख घेत असतात. मुळात हे दोघे निवडणुकीच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राज्यात स्थापन झालेल्या फडणवीस सरकारमध्ये त्या ग्रामविकास मंत्री हेात्या, तर धनंजय मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते.

Dhananjay Munde Big Statement on Brother Sister Relation


Previous Post

सूरतमध्ये सापडल्या दोन हजाराच्या खोट्या नोटांचा साठा; नावातील या बदलामुळे झाले उघड

Next Post

अखेर ठरलं! या तिघांपैकी एक जण होणार काँग्रेस अध्यक्ष

Next Post

अखेर ठरलं! या तिघांपैकी एक जण होणार काँग्रेस अध्यक्ष

ताज्या बातम्या

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023

…तर व्हॉट्सअॅपच्या वापरावर येणार मर्यादा; सर्वोच्च न्यायालयाने दिले हे आदेश

February 3, 2023

ठाकरे गटाच्या नेत्यांना थेट आयफोन वापरण्याचा सल्ला; पण का? त्याने काय होणार?

February 3, 2023

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना आणि सूचना, तत्काळ येथे पाठवा

February 3, 2023

नाचणी कुकीज, लाडू, बाजरी चिवडा, नाचणी सत्व या पदार्थांना मोठी मागणी; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

February 3, 2023

भाजपची निवडणूक तयारी सुरू; राज्यभरात प्रवक्त्यांची अशी आहे तगडी फौज (बघा संपूर्ण यादी)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group