नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला मोठा झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या एकूण तीन सुनावण्या होत्या. त्यातील राजकीय सत्ता संघर्षाची सुनावणी ही आज होऊ शकली नाही. ही सुनावणी आता उद्या म्हणजे, २३ ऑगस्ट रोजी होणार आहे. तर, मागासवर्गीय समाजाला ९२ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण देण्याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका राज्य सरकारने केली होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज विशेष खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, या पुढील सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली आहे. तर, मुंबई आणि पुणे या दोन्ही महापालिकांमधील वॉर्ड रचनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला आहे.
या निकालाद्वारे न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका दिला आहे. या दोन्ही महापालिकांमधील वॉर्ड पुर्नरचना बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, या दोन्ही महापालिकांमधील वॉर्ड पुर्नरचना जैसे थे ठेवावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दणका मिळाला आहे.
Supreme Court Order on Municipal Corporation Ward
Maharashtra Government