नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी असे काही घडले की, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड संतापले. न्यायालयीन प्रक्रियेशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला त्यांनी जोरदार फटकारले. नाराजी व्यक्त करत सरन्यायाधीशांनी बजावले की, ‘माझ्या अधिकाराशी खेळू नका’. या सर्व प्रकरणाची सध्या देशभरात जोरदार चर्चा होत आहे.
दररोज सकाळी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सर्वोच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांसमोर खटल्यांच्या तातडीच्या यादीसाठी सरासरी सुमारे १०० प्रकरणांची सुनावणी करते. आज, मंगळवारी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ असे करत असताना, एका वकिलाने लवकर तारखेसाठी आग्रह धरला. मात्र, सरन्यायाधीशांनी ते प्रकरण १७ एप्रिलसाठी आधीच सूचीबद्ध केले होते. एकदा नकार दिल्यानंतरही वकील सहमत न झाल्याने सरन्यायाधीश संतापले.
सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांचाही समावेश होता. यानंतरही वकिलाने ते मान्य केले नाही, त्यांनी मला माफ करा, परवानगी दिल्यास मी दुसऱ्या खंडपीठासमोर नमूद करू शकतो, असे सांगितले. यावर सरन्यायाधीश संतापले.
वकिलाला फटकारताना सरन्यायाधीश म्हणाले की, तुम्हीही मला माफ करा, पण माझ्या अधिकाराशी खेळू नका. माझ्याशी ही युक्ती खेळू नका. लवकर तारखेसाठी तुम्ही येथे आणि नंतर इतरत्र त्याचा संदर्भ घेऊ शकत नाही. आम्ही १७ एप्रिलची तारीख देत आहोत आणि १७ तारखेलाच सुनावणी होईल. त्वरीत तारीख मिळविण्यासाठी कुठलाही उद्योग करु नका, असा सज्जड दम सरन्यायाधीशांनी बरला.
सरन्यायाधीशांची नाराजी ओळखून वकिलाने खेद व्यक्त केला आणि त्यांच्या युक्तिवादासाठी त्यांना माफ करावे, असे सांगितले. मात्र, या सर्व प्रकरणाची न्यायालयीन वर्तुळासह देशभरात जोरदार चर्चा होत आहे. या वकिलाने सरन्यायाधीशांवर एकप्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळेच सरन्यायाधीश संतापले.
Supreme Court CJI Chandrachud Furious