नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण यांच्यातील याचिकेवर आज अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता २५ फेब्रुवारी रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तब्बल एक महिन्यानंतर ही सुनावणी होणार असल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर या निवडणुका लांबणीवर पडत आहे. कोर्टाने या निवडणुकीला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. पण, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली. त्यामुळे हा मुद्दा न्यायालयाच्या निर्णयानंतर सुटणार आहे.
राज्यातील २९ महानगरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद, २८९ पंचायत समित्यांच्या निवडणुकी प्रलंबित आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान आज निकाल लागेल अशी शक्यता पकडून गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पण, त्यांचाही हिरमोड झाला.