नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संशोधकांनी पार्किन्सन म्हणजेच कंपवात या आजाराच्या उपचारांमध्ये महत्त्वाचे ठरणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. 17β-Estradiol नावाचे एक संप्रेरक सातत्याने स्रवत राहण्यास सहाय्यकारक ठरणारी एक लक्ष्यित नॅनो संरचनेची निर्मिती संशोधकांनी विकसित केली आहे.
पार्किन्सन आजारासारखे अनेक मज्जातंतूविकृतीचे आणि मनोविकृतीचे आजार मानवी मेंदूतील 17β-Estradiol(E2) या संप्रेरकाच्या असंतुलनामुळे निर्माण होतात.
विज्ञान तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या मोहालीच्या नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी 17β-Estradiol हे संप्रेरक भरलेल्या कायटोसन नॅनोपार्टिकल्सयुक्त डोपामाईन रिसेप्टर D3 (DRD3) चा वापर केला, ज्यामुळे 17β-Estradiol (E2) हे संप्रेरक सातत्याने स्रवत राहून त्याचा पुरवठा मेंदूला होत राहिला.
या लक्ष्यित नॅनो- संरचना निर्मितीमुळे काल्पेनचे मायटोकॉन्ड्रियल स्थलांतर होण्यास प्रतिबंध झाला ज्यामुळे न्यूरॉन्सचे रोटेनॉन-चलित मायटोकॉन्ड्रियल हानीपासून संरक्षण होत राहिले. त्याशिवाय लक्ष्यित नॅनो पुरवठा प्रणालीमुळे उंदरांमधील मॉडेलमध्ये वर्तनात्मक दोष दूर होण्यास मदत झाली. त्याव्यतिरिक्त या अध्ययनात पहिल्यांदाच असे निष्पन्न झाले की पीआरसी1 कॉम्प्लेक्सचा BMI1 हा घटक काल्पेनचा थर असून तो मायटोकॉन्ड्रियल संतुलनावर नियंत्रण ठेवतो. लक्ष्यित नॅनो-फॉर्म्युलेशनमुळे काल्पेनच्या माध्यमातून होणाऱ्या त्याच्या अवमूल्यनाला प्रतिबंध होऊन BMI1 संरचनेचे पुनरुज्जीवन झाले. कार्बोहायड्रेट पॉलिमर्सच्या अभ्यासामुळे पार्किन्सन आजारामध्ये ऑक्सिडेटिव्ह ताणाचे नियमन करण्यात संप्रेरक (E2)ची भूमिका लक्षात येण्यास मदत झाली. दीर्घकालीन सुरक्षा आणि अधिक चांगल्या प्रकारे पुरवठा होण्याच्या वैशिष्ट्यामुळे हे औषध पार्किन्सनच्या रुग्णांचे जीवन सुधारण्यासाठी एक सुरक्षित औषध ठरू शकते.