पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पर्यावरणाबाबत संपूर्ण विश्वच चिंतेत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी पावले उचलली जात आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक हानिकारक मानले गेले आहे. यामुळेच भारत सरकारकडून प्लास्टिकचा वापर करण्यावर निर्बंध घातले गेले आहेत. प्लास्टिकच्या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. त्यातच पुण्यातील एका कंपनीचा भन्नाट प्रयोग समोर आला आहे. या कंपनीने थेट चिप्सच्या रिकाम्या पॅकेट्सपासून फॅशनेबल सनग्लासेस बनवले आहेत.
कंपनीचे संस्थापक अनिश मालपाणी यांनी आपल्या ट्विटरवर रिसायकल स्वरूपात तयार केलेले सनग्लासेस बाबत माहिती शेअर केली आहे. चीप्सचे पॅकेट आणि मल्टी-लेयर्ड प्लास्टिकपासून सनग्लासेस तयार करण्यामागील संपूर्ण प्रक्रिया दाखवली आहे. टाकाउपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे हे उत्तम उदाहरण आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हे आतापर्यंतचे सर्वात अवघड काम असल्याचेही मालपाणी यांनी सांगितले आहे. जगातील हे पहिले रिसायकल सनग्लासेस असल्याचा दावा व्हीडिओतून करण्यात आला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर ड्रेंडिंगमध्ये आहे.
चॉकलेट रॅपरचेही रिसायकलिंग
कंपनीमध्ये आणखी काय काय रिसायकल होते त्यावरही प्रकाश टाकला आहे. या कंपनीमध्ये फक्त चिप्सचे पॅकेटच नव्हे तर इतर सर्व प्रकारच्या प्लस्टिकचे रिसायकल करणे, अशक्य असणारे मल्टी-लेयर्ड प्लास्टिक पॅकेजिंग जसे की चॉकलेट रॅपर्स, दुधाचे पॅकेट, इतर कोणतेही जास्त थरांचे पॅकेजिंग रिसायकल केले जात असल्याचा दावा केला आहे. पुण्यातील एका लॅबमध्ये दोन वर्षापासून हे सनग्लासेस बनवणयाची प्रकिया चालू आहे. केवळ रिसायकलच नव्हे तर त्याला अगदी नवीन बनवण्याचा मार्गदेखील शोधला आहे. तसेच या कंपनीमध्ये सनग्लासेसपासून सुरू होणार्या मल्टी-लेयर्ड प्लास्टिकमधून चांगले साहित्य काढण्याचा आणि त्यावर प्रक्रिया करून उच्च दर्जाचे साहित्य आणि उत्पादने तयार केले जातात.
https://twitter.com/AnishMalpani/status/1626123868384665602?s=20
Sunglasses from Packet of Chips Pune Startup