नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन असेल महिलांसाठी डिजिटल तंत्रज्ञान प्रशिक्षण तसेच ज्येष्ठांसाठी मनोरंजन उपक्रम गोविंदनगर व परिसरातील सुंदर गोविंद लाशाखीय मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सुंदरगोविंद मित्र मंडळाचे अध्यक्ष निंबा अमृतकर यांनी केले.
सुंदर गोविंद लाशाखीय मित्र मंडळाच्या नुतन कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभाप्रसंगी श्री.अमृतकार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लायन्स क्लबचे प्रांतपाल राजेश कोठावदे, वाणी मित्र मंडळाचे विश्वस्त चंद्रकांत धामणे, विनोद दशपुते,सचिन बागड, अशोक सोनजे, दिलीप पाटकर, रविंद्र वाणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रसिका वाणी यांनी केले तर आभार राजेंद्र सोनजे यांनी मानले.
यावेळी नुतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष निंबा अमृतकर, उपाध्यक्ष शांताराम बधान, सचिव संदीप देव, खजिनदार रविंद्र सोनजे तर संचालकपदी प्रसाद बागड, योगेश नेरकर, राजेंद्र सोंजे, विजय खानकरी, संदीप खुटाडे, नितीन कोठावदे, प्रशंांत सोंजे, रविंद्र सोंजे, दत्तात्रय पाटकर, महेश सोंजे, डॉ. वैभव वाणी, भुषण पाटकर, सचिन राणे यांनी निवड करण्यात आली. तसेच सल्लागार म्हणून सचिन बागड, सुरेश धामणे, दिलीप पाटकर, गिरीश मालपुरे, जयंत येवला, जितेंद्र कोठावदे, उमेश महाजन, शिवाजी मेने, दिनेश येवला, उमेश येवला, बाळकृष्ण वाणी, शरद भामरे, प्रकाश शिरूडे, अमृत पाखले, भरत येवला, सुनील ब्राह्मणकर, किशोर धामणे, उमेश कोठावदे, सागर मालपुरे, भुषण सोंजे, शेखर राणे यांची निवड करण्यात आली.