मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये द्राक्षापासून वाईनची निर्मिती करणाऱ्या सुला विनयार्ड्सचा आयपीओ येणार आहे. Sula Vineyards IPO ला बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून मंजुरी मिळाली आहे. देशातील आघाडीची वाइन उत्पादक आणि सेलर सुला विनयार्ड्सला IPO जारी करण्यासाठी SEBI ची मंजुरी मिळाली आहे. कंपनीने या वर्षी जुलैमध्ये सार्वजनिक इश्यूसाठी मसुदा प्रॉस्पेक्टस दाखल केला होता.
हा आयपीओ थेट विक्री ऑफर (OFS) असेल. यामध्ये प्रवर्तक, गुंतवणूकदार आणि इतर भागधारक २५, ५४६, १८६ इक्विटी शेअर्स ऑफर करतील. सुला व्हाइनयार्ड्स ही लाल, पांढरी आणि स्पार्कलिंग वाईन विकते. ते १३ ब्रँडच्या अंतर्गत ५६ प्रकारचे मद्य तयार करते.
गेल्या वर्षी सुला विनयार्डसने अहवाल दिला की कंपनीची उत्पादन क्षमता १४.५ दशलक्ष लिटर आहे. कंपनीचा नफा आर्थिक वर्ष २२ मध्ये अनेक पटींनी वाढून ५२.१४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष २१ मध्ये केवळ ३.०१ कोटी रुपये होता. या कालावधीत महसूल ८.६०% वाढला आणि तो ४५३.९२ कोटी रुपये राहिला.
सुलाच्यावतीने दरवर्षी सुला फेस्ट भरविला जातो. या फेस्टमध्ये देशाच्या विविध भागातून तसेच परदेशातूनही पर्यटक येतात. देशातील महत्त्वाच्या फेस्टमध्ये आता सुला फेस्टचा समावेश झाला आहे.
Sula Vineyards SEBI Permission IPO Soon