सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) तालुक्यातील मोह शिवारात ३० वर्षींय विवाहितेने दहा वर्षाची मुलगी व आठ वर्षाच्या लहान मुलासह पाझर तलावात आत्महत्या केली. ज्योती विलास होलगिर (३०), गौरी विलास होलगिर(१०) व साई विलास होलगिर(८) असे मृत तिघांची नावे आहेत. या घटनेत पती, सासरा व सासू या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास ही घटना समोर आली होती. त्यानंतर मयत विवाहितेचा भाऊ सुनील चिंधू सदगीर (२६) रा. हिसवळ ता. नांदगाव यांनी एमआयडीसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी या तक्रारीवरुन पती, सासरा, सासू, दीर व जाव अशा पाच जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
या घटनेबाबत समजेलली माहिती अशीक, शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता ज्योती होलगिर या निघून गेल्याची माहिती सासरे पांडुरंग होलगिर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर शोधाशोध सुरु झाली. पण, रविवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास या तिघांचे मृतदेह मोह शिवारातील पाझर तलावात मिळून आले. मयत विवाहितेचा भाऊ सुनील चिंधू सदगीर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सासरच्या लोकांकडून लग्न झाल्यापासून माहेरुन एक लाख रुपये आणावे या कारणासाठी शारीरिक व मानसिक छळ केला जात होते.