गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्वामी रामानुजाचार्य आहेत तरी कोण? पंतप्रधान मोदींनी केले पुतळ्याचे उदघाटन

by India Darpan
फेब्रुवारी 8, 2022 | 9:16 am
in संमिश्र वार्ता
0
statue of equality

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेकडो वर्षापासून भारतावर परकीयांचे अगणित हल्ले होत आहेत, पण भारताची अखंडता, एकता आणि संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी अनेक वीर, महात्मे, संत, कवी इत्यादींनी या भूमीवर जन्म घेऊन तिचे सर्व प्रकारे रक्षण केले. एक हजार वर्षांपूर्वी असाच एक काळ होता, तेव्हा भारताच्या सांस्कृतिक व धार्मिक स्वाभिमानाला धोका निर्माण झाला होता. अत्याचार, लूटमार आणि परकीय आक्रमकांच्या भीतीमुळे सर्व सामान्य माणसाला भय आणि निराशेने घेरले होते. अशा परिस्थितीत तामिळनाडू राज्यातील श्रीपेरुंबदूर नावाच्या गावात सन १०१७ मध्ये एका ब्राह्मण कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव लक्ष्मण होय, तेच पुढे स्वामी रामानुजाचार्य म्हणून भारतभर प्रसिद्ध झाले, त्यांचे जीवन व कार्य खूपच प्रेरणादायी असून भारतीय संत परंपरेत आदिगुरू शंकराचार्य यांच्या नंतर स्वामीजींचे नाव घेतले जाते कारण त्यांनी मानवी समतेसाठी दिला लढा होता.

आई कांतिमती आणि वडील केशव त्यांना लक्ष्मण म्हणत. त्या बालकाच्या मनात बालपणापासून भक्तीचे असे बीज पेरले की, त्यांनी जनमानसात सांस्कृतिक क्रांती, चेतना आणि जागरण घडवून आणली. लहान वयातच वडील गमावल्यानंतर हा मुलगा आपल्या कुटुंबासह कांचीला जातो काय आणि ‘यादव प्रकाश’ कडून वेदांताचे शिक्षण घेतो काय, आपल्या गुरूंच्या वेद चर्चा आणि तर्काने असमाधानी होते, पुढे हेच मूल नंतर अलवर संत श्रीपाद यमुनाचार्य जी महाराज यांच्या आश्रयाने जाते आणि त्यांचा मुख्य शिष्य बनतो, सारे काही अचंबित करणारे, पण वास्तव आहे. संत यमुनाचार्यांच्या भेटीनंतर, एक अभूतपूर्व घटना घडली, ज्यामुळे एक सामान्य बालक असाधारण बनण्याची प्रक्रिया सुरू झाली. खरे म्हणजे हे काम खूप अवघड होते पण जिद्द, अफाट इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि गुरूंच्या आशीर्वादाने हे कार्य पूर्ण झाले आणि लक्ष्मण ते श्रीपाद स्वामी रामानुजाचार्य असा प्रवासही पार पडला.

आचार्य रामानुजांचा विवाह लहान वयातच थंगम्मा नावाच्या तरुणीशी झाला होता. त्यांच्या पत्नीच्या एका कृतीमुळे आचार्यजींना खूप त्रास झाला, त्यांच्या दृष्टीने केवळ माणूसच नाही तर प्रत्येक जीवही ईश्वरासारखाच होता. या घटनेनंतरच त्यांनी गृहत्याग करून संन्यास घेतला. पुढे याच दूरदृष्टीमुळे तथाकथित कनिष्ठ जातीच्या लोकांचा उद्धार झाला, त्यांना मंदिरात प्रवेश, समाजात आदर आणि देवाची भक्ती लाभली. म्हैसूरपासून काही अंतरावर असलेल्या श्रीरंगम शहरातील श्रीरंगनाथ मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून आचार्य यांनी अनेक वर्षे परमेश्वराची सेवा केली. त्या काळातील महान संत श्रीपाद गोष्टिपूर्ण जी महाराज यांच्याकडून महामंत्र शिकण्यासाठी आचार्य यांनी १७ वेळा भेटत घेतली, आणि त्यांच्याकडून “ओम नमो नारायणाय” हा महामंत्र घेतला. पण त्यांनी प्रथम अपमान केला, नंतर अपराधीपणाने नतमस्तक होत, रामानुजाचार्यांना आपले गुरू मानले.

“ब्रह्मसूत्रांवर भाष्य लिहिण्याचा” पहिला संकल्प पूर्ण करण्यासाठी आचार्यांना बोधायन ऋषींनी रचलेल्या “बोधायन वृत्ती” चा अभ्यास करणे आवश्यक होते. तेव्हा आचार्यांनी ते पुस्तक शोधण्यासाठी खूप धडपड केली आणि त्यांना त्या ग्रंथाची एकच प्रत उपलब्ध आहे, असे समजले, तीही दुर्गम काश्मीरच्या खोऱ्यात बांधलेल्या ‘श्री शारदापीठम’मध्ये होती. आचार्य काश्मीरला पोहोचले आणि तेथे पंडितांनी प्रत देण्यास नकार दिल्याने त्यांची निराशा झाली. मात्र असे मानले जाते की, माता सरस्वती स्वतः त्या मंदिरात प्रकट होऊन पुस्तकाची प्रत आचार्यांकडे सोपवली. पुन्हा ते दक्षिण भारतात निघाले तेव्हा पुजारी त्याच्यावर जंगलात हल्ला करतात आणि पुस्तक हिसकावून घेतात, परंतु त्यांच्या एका शिष्याची एक अद्भुत स्मरणशक्ती होती, त्यामुळे तो संपूर्ण पुस्तक एका दृष्टीक्षेपात लक्षात ठेवू शकला, त्याच्या मदतीने आचार्य “श्री भास्यम्” ची रचना केली आणि या महान निर्मितीमुळे त्यांना “श्री संप्रदाय शिरोमणी” असेही म्हणतात.

कावेरी नदीच्या काठावर वसलेला मेलुकोट हा डोंगराळ प्रदेश अतिशय सुंदर आहे. आचार्य यांनी या ठिकाणी सुमारे १२ वर्षे आपले तप करीत कार्यस्थान बनवले आणि श्री चेलुव नारायण मंदिरात प्रभूची सेवा केली. संत रामानुजाचार्य यांचे जीवन खूप प्रेरणादायी आहे. आचार्य शंकराच्या अद्वैताच्या विपरीत त्यांनी ‘विशिष्टद्वैत’ रचले. वैष्णव धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी भारतभर फिरून जनजागृतीचे कार्य केले. त्यांच्या हयातीत त्यांनी अनेक रचना रचल्या, भाष्ये लिहिली, पण ‘श्री भास्यम्’ आणि ‘वेदांत संगम’ ही सर्वात लोकप्रिय कामे आहेत. वेदांखेरीज सातव्या-दहाव्या शतकातील गूढवादी आणि भक्तीवादी अल्वर संतांचे भक्ती तत्त्वज्ञान आणि दक्षिणेतील पंचरात्र परंपरेवर त्यांनी आपल्या विचारांचा आधार घेतला. रामानुजाचार्य वयाच्या १२० वर्षी ते ब्रह्मलीन झाले. अशा या तेजस्वी, विवेकी दिव्य आचार्य यांच्या सहस्राब्दीत सर्वात मोठ्या आसनस्थ पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांनी केले. या बद्दल संपूर्ण भारतच नव्हे, तर जगभरातील भाविक कृतज्ञता व्यक्त करत आहेत. त्याला भारतीय सांस्कृतिक क्रांतीची आणि चेतनेची ही सुरुवात म्हटले जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ह्युंदाईवर होतेय बहिष्काराची जोरदार मागणी; पण का?

Next Post

नाशिक – जिल्हयात ४ हजार ३०४ रुग्ण: महानगरपालिका क्षेत्रात २ कोटी ४४६ तर पंधरा तालुक्यात १ हजार ७४० रुग्ण

India Darpan

Next Post
carona 1

नाशिक - जिल्हयात ४ हजार ३०४ रुग्ण: महानगरपालिका क्षेत्रात २ कोटी ४४६ तर पंधरा तालुक्यात १ हजार ७४० रुग्ण

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011