नाशिक – नाशिक जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे आज चेतना दिन साजरा करण्यात आला. राणे नगर येथील नागरी सेवा प्रबोधिनीमधील संघटनेच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. ११ ऑगस्ट १९६६ रोजी एक दिवसाचे सामुहिक किरकोळ रजा आंदोलन करून संघटनात्मक सामुहिक आंदोलनाचा पाया रचला गेला होता. तो स्मृती दिवस म्हणून चेतना दिन साजरा केला जात असल्याची माहिती देऊन यावेळेस पदाधिका-यांनी देत मार्गदर्शन केले. यावेळी कर्मचाऱ्यांचे श्रध्दास्थान कॅा. र.ग.कर्णिक, आणि कॉ. भाई आचरेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सरकारी सेवेत आणि सार्वजनिक जीवनात कार्यरत राहण्याची देशसेवेची प्रतिज्ञा सर्व पदाधिकारी यांनी घेतली. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ, श्यामसुंदर जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. कोषाध्यक्ष गोविंदा लहामगे, उपाध्यक्ष अर्चना देवरे, जितेंद्र पालवे, संपर्क प्रमुख शामसुंदर जोशी, प्रसिद्धी प्रमुख डी.जी.पाटील, संघटक मिलिंद जगताप, डॉ.पंकज वाघ, राजेंद्र आहिरे वर्ग ४ सरचिटणीस, सौ.जोशी मॅडम उपस्थित होते.