मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या एक्सप्रेस वे संदर्भात राज्य सरकारने आज विधिमंडळात मोठी घोषणा केली आहे. यासंदर्भात आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. लक्षवेधी चर्चा दरम्यान, याप्रश्नी चर्चा झाली. याच एक्सप्रेस वेवर आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन नुकतेच झाले आहे. हाच मुद्दा धरुन पवार यांनी मागणी केली की, हा एक्सप्रेस वे थेट आठपदरी करावा.
या चर्चेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. एक्सप्रेस वेवर अपघात झाला आणि त्यासंदर्भातील माहिती पोलिसांना देताक्षणी पोलिसांना अपघाताचे लोकेशन कळेल, अशी यंत्रणा विकसित केली जाणार आहे. जेणेकरुन तत्काळ मदत मिळण्यास मदत होईल. तसेच, उपग्रहाद्वारे या एक्सप्रेस वेवर लक्ष ठेवणारी यंत्रणा विकसित केली जाईल. याद्वारे लेन सोडून चालणाऱ्या वाहनांची माहिती तत्काळ यंत्रणांना कळेल. त्याची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
https://twitter.com/NCPspeaks/status/1561598391976882179?s=20&t=JdYrHv33vngKirm1AmLwEg
State Government Big Announcement for Mumbai Pune Expressway
Maharashtra Assembly Session