इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जमिनी मोजणी शुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला आहे. अवघे २०० रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र व नकाशे आता देण्यात येणार आहे. पूर्वी शुल्क एक हजार ते चार हजार रुपे प्रति हिस्सा आकारण्यात येत होती. आता हे शुल्क आता थेट २०० रुपये असणार आहे. त्यामुळे शेतकर्यांचा मोजणी खर्च वाचणार आहे.
या नोदंणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येते. एका क्लिकवर काही कागदपत्रांसह शुल्क भरून जमीन मोजणीसाठी अर्ज करता येतो. केवळ २०० रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र व नकाशे आता दिले जाणार आहे.
अशी होते मोजणी
साधी मोजणी… साधी मोजणीला जास्त काळ लागतो. सहा महिन्यात ही मोजणी करण्यात येते. सरकार दरबारी त्यासाठी १०० रुपये जमीन मोजणी शुल्क जमा करावे लागते.
जलद मोजणी…शेतकऱ्याला जर जमिनीची जलद मोजणी करायची असेल तर २००० रुपये भरावे लागतात. तरीही या मोजणीसाठी तीन महिन्यांची प्रक्रिया आहे.
अतिजलद मोजणी…या मोजणीसाठी शेतकऱ्याला ३००० रुपये जमा करावे लागतात. जलद मोजणीसाठी तीन महिने तर अतिजलद मोजणीसाठी एक हजार रुपये अधिक द्यावे लागतात.