मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. बँकेने अनेक खाती गोठवली आहेत. म्हणजेच आता या खातेदारांना त्यांच्या खात्यातून कोणताही व्यवहार करता येणार नाही. बँकेने असे का केले, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. यावर या खातेदारांनी त्यांची केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही हे कारण सांगण्यात येत आहे. खरं तर बँकेकडून अनेकदा ग्राहकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती केली होती. तरीदेखील ज्या ग्राहकांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यांचे खाते गोठवण्यात आले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक गौरव अग्रवाल ट्विटरवर लिहितात, ‘मी केवायसी न केल्यामुळे माझ्या खात्यावरील व्यवहार प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. पण मला कोणीही केवायसी अपडेट करण्यास सांगितले नाही. यावर टिप्पणी करताना एसबीआयने लिहिले की, ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, ग्राहकांना वेळोवेळी केवायसी अपडेट करावे लागते. अशा परिस्थितीत, ज्या ग्राहकाची केवायसी प्रक्रिया अपूर्ण होती. त्यांना एसएमएससह इतर अनेक माध्यमातून याची माहिती देण्यात आली. बँकेने ग्राहकांना पुढे सांगितले आहे की, ‘सूचनेनुसार ग्राहकांनी तुमच्या शाखेत जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच ग्राहकांनी आपल्या नोंदणीकृत ई – मेल आयडीवरून तुमच्या केवायसी दस्तऐवजाची प्रत शाखेच्या अधिकृत ई – मेल आयडीवर पाठवा.
https://twitter.com/TheOfficialSBI/status/1543220329534955520?s=20&t=xWfrx6ky7I-sXMpBO5Ozrw
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, चालक परवाना, आधार पत्र / कार्ड, मनरेगा कार्ड, पॅन कार्ड
ही प्रक्रिया कशी पूर्ण होईल?
एसबीआय ग्राहकांना त्यांची आवश्यक माहिती एका विशिष्ट स्वरूपात स्वाक्षरीसह बँकेला द्यावी लागेल. ग्राहक पोस्ट किंवा ई – मेलद्वारेही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
State Bank Of India Sbi Customer Accounts Freeze