मुंबई – सध्याच्या काळात बँकेमध्ये नोकरीची तरुणांना चांगली संधी आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस्ड ऑफिसरच्या पदांवर भरती होणार आहे. बँकेने याबाबत अधिसूचना जारी केली असून एकूण १२२६ पदांसाठी भरती होणार आहे.
1) पात्र आणि इच्छुक उमेदवार २९ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, स्क्रीनिंग आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिक माहिती जाणून घ्यावी.
– अर्ज करण्याची सुरुवात तारीख: ९ डिसेंबर २०२१.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ डिसेंबर २०२१.
– प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची अंतिम तारीख: १२ जानेवारी २०२१.
– ऑनलाइन परीक्षा: जानेवारी २०२२.
2) सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे अर्ज करू शकतात. यात निवडलेल्या उमेदवारांना सुमारे ३६ हजार रुपये मूळ वेतन मिळेल. त्याचबरोबर डीए, एचआरए, लीज रेंटल, सीसीए, मेडिकल आणि इतर भत्ते यांचाही लाभ नियमानुसार मिळणार आहे.
3 ) सामान्य श्रेणी व ओबीसी मधील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC, ST आणि PWBD अंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क नाही.
4) शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती अशी : उमेदवार शैक्षणिक पात्रता आणि विविध माहितीसाठी अधिकृत सूचना वाचावे
5) भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया करा
१. सर्वप्रथम उमेदवार sbi.co.in किंवा sbi.co.in/careers या वेबसाइटला भेट द्या.
२. मेनपेजवर नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करण्यासाठी एसबीआय – सीबीओ भरती जाहिरातीवर क्लिक करा.
३. नोंदणीनंतर तयार केलेला वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
४. सर्व तपशील देऊन आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज भरणे सुरू करा.
५. अर्ज फी भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
६. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट घ्यायला विसरू नका.