मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेने (SBI) ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) आणि रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये ५० बेस पॉईंट्सची वाढ केली आहे. बँकेचा नवीन EBLR दर आता ८.५५% आणि RLLR दर ८.१५% आहे. हे नवीन दर १ ऑक्टोबर पासून लागू झाले आहेत.
नव्या वाढीनंतर नवीन ग्राहकांना गृहकर्जासाठी अधिक व्याज द्यावे लागणार आहे, तर जुन्या ग्राहकांच्या ईएमआयमध्येही वाढ होणार आहे. जर एखाद्या ग्राहकाने २० वर्षांच्या कालावधीसाठी ३५ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल. ग्राहकांच्या गृहकर्जावरील जुना व्याजदर ८.०५ टक्के होता, तर आता वाढीनंतर ८.५५ टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. हे कर्ज २० वर्षांच्या कालावधीसाठी घेतले असल्यास, दरमहा EMI ११०१ रुपयांनी वाढणार आहे.
तथापि, EMI मधील वाढ मुख्यत्वे तुमच्या उर्वरित मूळ रकमेवर, तसेच कर्जाच्या कालावधीवर अवलंबून असते. आरबीआयने रेपो रेट ०.५० टक्क्यांनी वाढवला आहे. आरबीआयने रेपो दरात सलग चौथ्यांदा वाढ केली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकांना कर्जे महाग करणे सोपे झाले आहे. यामुळेच ताज्या दरवाढीनंतर खासगी आणि सरकारी बँकांनीही कर्जावर अधिक व्याज आकारण्यास सुरुवात केली आहे.
असे आहे गणित
मूळ रक्कम- ३५ लाख रुपये
गृहकर्जाचा कालावधी- २० वर्षे
जुना व्याज दर – ८.०५%
जुना ईएमआय – २९,३८४ रुपये
नवीन व्याजदर- ८.५५%
नवीन EMI – रु ३०,४८५
दरमहा वाढ – रु ११०१
State Bank of India Loan Interest Rate Increase
EMI Effect