India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

स्टेट बँकेचा ग्राहकांना दणका; तुमचा EMI एवढा वाढणार

India Darpan by India Darpan
October 2, 2022
in संमिश्र वार्ता
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेने (SBI) ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) आणि रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये ५० बेस पॉईंट्सची वाढ केली आहे. बँकेचा नवीन EBLR दर आता ८.५५% आणि RLLR दर ८.१५% आहे. हे नवीन दर १ ऑक्टोबर पासून लागू झाले आहेत.

नव्या वाढीनंतर नवीन ग्राहकांना गृहकर्जासाठी अधिक व्याज द्यावे लागणार आहे, तर जुन्या ग्राहकांच्या ईएमआयमध्येही वाढ होणार आहे. जर एखाद्या ग्राहकाने २० वर्षांच्या कालावधीसाठी ३५ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल. ग्राहकांच्या गृहकर्जावरील जुना व्याजदर ८.०५ टक्के होता, तर आता वाढीनंतर ८.५५ टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. हे कर्ज २० वर्षांच्या कालावधीसाठी घेतले असल्यास, दरमहा EMI ११०१ रुपयांनी वाढणार आहे.

तथापि, EMI मधील वाढ मुख्यत्वे तुमच्या उर्वरित मूळ रकमेवर, तसेच कर्जाच्या कालावधीवर अवलंबून असते. आरबीआयने रेपो रेट ०.५० टक्क्यांनी वाढवला आहे. आरबीआयने रेपो दरात सलग चौथ्यांदा वाढ केली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकांना कर्जे महाग करणे सोपे झाले आहे. यामुळेच ताज्या दरवाढीनंतर खासगी आणि सरकारी बँकांनीही कर्जावर अधिक व्याज आकारण्यास सुरुवात केली आहे.

असे आहे गणित
मूळ रक्कम- ३५ लाख रुपये
गृहकर्जाचा कालावधी- २० वर्षे
जुना व्याज दर – ८.०५%
जुना ईएमआय – २९,३८४ रुपये
नवीन व्याजदर- ८.५५%
नवीन EMI – रु ३०,४८५
दरमहा वाढ – रु ११०१

State Bank of India Loan Interest Rate Increase
EMI Effect


Previous Post

देशातील तब्बल १२ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; मिळणार एवढा दिवाळी बोनस

Next Post

धडाssम! ६०० किलो स्फोटके…. १,३०० छिद्रे…. अवघे काही सेकंद…. चांदणी चौकातील पूल असा कोसळला (बघा व्हिडिओ)

Next Post

धडाssम! ६०० किलो स्फोटके.... १,३०० छिद्रे.... अवघे काही सेकंद.... चांदणी चौकातील पूल असा कोसळला (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

February 2, 2023

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणीस सुरु, कुणाचे पारडे जड? सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील?

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group