शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारताची गरिबी आणखी कमी होणार…हा महत्वाचा अहवाल प्रसिद्ध

by Gautam Sancheti
जून 11, 2025 | 3:58 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधक फोटो

प्रातिनिधक फोटो


नवी दिल्ली(इंडिया दर्पण वृत्तसेवा)-स्टेट बँकेने एक महत्वाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये देशातील गरिबीच्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, देशातील गरिबी सतत कमी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढच्या काही काळात गरिबीचे प्रमाण ४.६ टक्क्यांपर्यंत खाली येणार असल्याची माहिती स्टेट बँकेच्या अहवालात देण्यात आली आहे.

स्टेट बँकेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशातील गरिबीत घट होऊ शकते. देशातील गरिबीचे आकडे सतत कमी होत आहेत. देशातील गरिबी ४.६ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. भारताने गरिबी कमी करण्यात प्रचंड प्रगती केली आहे. अहवालानुसार, गरिबीची पातळी आणखी कमी झाली आहे. ती जागतिक बँकेच्या अंदाजापेक्षाही चांगली आहे. या कपातीचे मुख्य कारण म्हणजे नवीन डेटा संकलन पद्धती. भारताने त्यांच्या अलिकडच्या घरगुती वापर खर्च सर्वेक्षणामध्ये जुन्या एकसमान संदर्भ कालावधी (यूआरपी) ऐवजी सुधारित मिश्रित आठवण कालावधी (एमएमआरपी) पद्धत स्वीकारली आहे.

डेटा करण्याची पद्धत
एकसमान संदर्भ कालावधी नवीन खरेदी केलेल्या वस्तूंसाठी कमी रिकॉल कालावधी वापरतो. तो घरगुती वापराचा अचूक अंदाज देतो. यामुळे राष्ट्रीय सर्वेक्षणांमध्ये वापराची पातळी वाढली आहे. त्यामुळे गरिबीचे अंदाज कमी होतात. उदाहरणार्थ, २०११-१२ मध्ये ‘एमएमआरपी’ पद्धतीचा वापर करून दारिद्र्य रेषेचा दर २२.९ टक्क्यांवरुन १६.२२ टक्क्यांपर्यंत घसरला होता. जुन्या पद्धतीत ज्याचे दररोजचे उत्पन्न २.१५ डॉलर आहे, त्याला दारिद्र्यरेषेच्या वर आहे, असे समजले जात होते. २०२२-२३ च्या सर्वेक्षणात, नवीन निकषानुसार, प्रतिदिन तीन डॉलरच्या वर उत्पन्न असलेल्यंची गणना दारिद्र्यरेषेच्या वर केली जात होती. पूर्वी दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या ५.२५ टक्के होती. आता ही २.३५ टक्के इतकी कमी होती.

सरकारचे प्रयत्न
जागतिक स्तरावर २२६ दशलक्ष लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत; परंतु भारताने येथे सकारात्मक फरक केला आहे. भारत सरकारकडून गरिबी कमी करण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विविध उपाययोजनादेखील राबवल्या जात असल्याची माहिती स्टेट बँकेच्या अहवालात देण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट…ही आहे कारणे

Next Post

पृथ्वी चुंबकाच्या निर्यातीवर बंदीने वाहन उद्योग संकटात

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधिक फोटो

पृथ्वी चुंबकाच्या निर्यातीवर बंदीने वाहन उद्योग संकटात

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011