इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांच्या विशेषतः महिला वर्गाच्या आयुष्यात विशेष स्थान असतं. म्हणूनच या वाहिन्या देखील प्रेक्षकांची आवड जपत वेगळ्या पद्धतीच्या मालिका प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करत असतात. पूर्वी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच वाहिन्या यात होत्या. मात्र, आता यातही स्पर्धा निर्माण झाली आहे. आणि या स्पर्धेत स्टार प्रवाह ही मालिका आपले वेगळे स्थान जपून आहे.
‘स्टार प्रवाह’ने आजवर अनेक दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणून त्यांचे मनोरंजन केले आहे. मालिका, त्यातील पात्रांवर प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रेम केले. त्यामुळे स्टार प्रवाहवरील मालिका कायम टीआरपी रेटिंगमध्ये अव्वल असतात. नव्या वर्षात नव्या मालिकेची भेट प्रेक्षकांना देण्यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनी सज्ज आहे. ‘मुरांबा’ आणि ‘लग्नाची बेडी’ या दोन मालिकांना मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादानंतर येथे ‘शुभविवाह’ ही नवी मालिका सुरू होतेय. या मालिकेच्या प्रोमोनंतर प्रेक्षकांमध्ये देखील उत्साह आहे. विशेष म्हणजे, या मालिकेतील नायक – नायिकेपेक्षा यातील खलनायिकेची जास्त चर्चा आहे. कारण यातील खलनायिका खास असल्याचे बोलले जात आहे.
बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट म्हणजे ‘शुभविवाह’ ही मालिका.
https://twitter.com/StarPravah/status/1607293009728573440?s=20&t=G2Rp92khSxAUGWVwFIsWgg
अभिनेत्री कुंजिका काळविंट या मालिकेत पौर्णिमा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने कुंजिकाची नव्या वर्षाची सुरुवात दमदार होणार आहे. यात मुख्य पात्राची म्हणजेच भूमीची भूमिका अभिनेत्री मधुरा देशपांडे साकारणार आहे. तर भूमीच्या सावत्र बहिणीची म्हणजेच पौर्णिमा ही व्यक्तिरेखा अभिनेत्री कुंजिका काळवीट साकारणार आहे. याबाबत कुंजिका सांगते की, ‘सगळीकडे लग्नाचा छान माहोल आहे आणि अशातच आमची ‘शुभविवाह’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. मी गेले वर्षभर एका चांगल्या कथानकाच्या आणि चांगल्या पात्राच्या शोधात होते. ‘शुभविवाह’ ही मालिका म्हणजे माझी स्वप्नपूर्ती म्हणता येईल. या मालिकेच्या निमित्ताने नव्या वर्षाची सुरुवातच दमदार झाली आहे. पौर्णिमा या पात्राकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. मी मालिकेत खलनायिका साकारणार याचा अंदाज प्रेक्षकांना पहिला प्रोमो पाहूनच आला असेल. खरतर नकारात्मक भूमिका साकरताना खूप कस लागतो, असं कुंजिका सांगते.
मालिकेत हे पात्र पुढे काय करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. मालिकेत सगळे दिग्गज कलाकार आहेत. भूमी आणि मी मालिकेत सावत्र बहिणी आहोत. मालिकेत आमचं पटत नसलं तरी पडद्यामागे मात्र आमची छान गट्टी जमली आहे. रुम शेअर करण्यापासून ते अगदी एकमेकांची मत जाणून घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी खूप आपलेपणाने करतो. या मालिकेमुळे मला एक छान मैत्रीण मिळाली आहे असंच म्हणायला हवं. प्रत्येक पात्र हे त्या अभिनेत्याच्या आयुष्यात आपली एक छाप सोडत असतं. पौर्णिमा हे पात्र साकारणं हे एक अभिनेत्री म्हणून नक्कीच आव्हानात्मक आहे. ‘स्टार प्रवाह’सोबत माझी पहिली मालिका आहे त्यामुळेही खूपच उत्सुकता असल्याचे कुंजिकाचं म्हणणं आहे.
https://twitter.com/StarPravah/status/1602581741545263104?s=20&t=G2Rp92khSxAUGWVwFIsWgg
Star Pravah New TV Serial Shubhvivah Actress Villon
Entertainment