इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – समाजातील शोषित-पीडित व अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्याचं काम वकील करत असतात. पण अलाहाबाद उच्च न्यायालयात एका वकिलाने चक्क महिला न्यायाधिशांसोबत गैरवर्तन करून व्यवसायाला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी वकिलाला उच्च न्यायालयात प्रॅक्टीस करण्यास मनाई केली आहे. केवळ उच्च न्यायालय नव्हे तर अलाहाबादमधील कुठल्याच न्यायालयात त्याला प्रॅक्टीस करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. २० डिसेंबर २०२२ ची घटना महिला न्यायाधिशाने एका पत्रातून मांडली आहे. वकिलाच्या कृत्यामुळे आपल्याला न्यायालयातून उठून जावे लागले आणि आपल्या प्रतिष्ठेचे व स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी चेंबरचा आश्रय घ्यावा लागला. पण तरीही त्या वकिलाचा माज उतरलेला नव्हता. त्याने २१ डिसेंबरला पुन्हा महिला न्यायाधिशांशी गैरवर्तन केले. शिविगाळ केली. एवढ्यावर हे वकील महाशय थांबले नाहीत, त्यांनी महिला न्यायधिशांना न्यालयातच जाहीर आव्हानही दिले. या घटनेची गंभीर दखल घेत अलाहाबाद न्यायालयाने आरोपी वकिलाला १२ जानेवारीला व्यक्तिशः हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
आमचं लक्ष असेल
या प्रकरणावर अहालाबाद उच्च न्यायालयात न्या. अश्विनी कुमार व न्या. शिवशंकर प्रसाद यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. भविष्यात कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही आणि न्यायलयाचे तुमच्यावर बारकाईने लक्ष असेल, असे न्यायालयाने आरोपिला खडसावले आहे.
महिला वकिलांचे काय?
महिला न्यायाधीशच न्यायालयात असुरक्षित असतील तर महिला वकिलांनी कुणाकडे बघावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. न्यायाधिशाच्या खूर्चीवर बसलेल्या महिलेसोबत जाहीररित्या गैरवर्तन करण्याची हिंमत एखादा आरोपी करत असेल तर तो न्यायालयाच्या परिसरात महिला वकिलांसोबत कसा वागू शकतो, याची कल्पना न केलेलीच बरी, अशी प्रतिक्रिया या घटनेवरून उमटत आहे. यावर न्यायालयाने महिलांनी देखील सावध राहावे, असा सल्ला दिला आहे.
Women Justice Advocate Insulting Legal Action
Lawyer Ahmedabad High Court