किरण घायदार, नाशिक
एसटी महामंडळाने अशोक लेलँड कंपनीकडून विकत घेतललेल्या २५०० साध्या डिझेल बसेसची मूळ प्रतिकृती (Prototype) तयार झाली असून तिच्या विविध तपासण्या करून प्रमाणित करण्यात येत आहे. तिची अंतिम तपासणी १० सप्टेंबर रोजी कंपनीच्या तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) येथील कारखान्यात करण्यात येणार आहे.
या बसेस महामंडळाच्या विनंतीवरून पुढील महिन्यापासूनच देण्यास कंपनी सुरू करणार आहे. आक्टोंबरमध्ये किमान ५० ते १०० लालपरी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील. नोव्हेंबरपासून १५०/३०० लालपरी यायला सुरुवात होईल.
१३१० बसेस भाडेतत्वावर
एसटी महामंडळ लवकरच एकूण १३१० (तेराशे दहा) बसेस या खासगी तत्वावर (भाडेतत्त्वावर) घेणार असून त्या राज्यातील विविध आगारांमध्ये त्यांचे वितरण केले जाणार आहे. या बसेस १२ मीटर लांबीच्या डिझेल इंधनवर चालणाऱ्या आहेत.