बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

श्रीलंका अभूतपूर्व संकटात! पंतप्रधान रानिल विक्रमसिंघेंचा पदत्याग; नागरिकांचा राष्ट्रपती निवासावर कब्जा

by India Darpan
जुलै 9, 2022 | 7:23 pm
in राष्ट्रीय
0
srilanka pm e1657374800734

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – श्रीलंकेतील गृहयुद्धा दरम्यान पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तातडीच्या बैठकीत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले. पंतप्रधान विक्रमसिंघे म्हणाले की, त्यांच्या राजीनाम्यामुळे देशात सर्वपक्षीय सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

आर्थिक संकटाचा सामना करत असलेला श्रीलंका सध्या गृहयुद्धाच्या भीषण टप्प्यातून जात आहे. पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महिंद्र राजपक्षे यांच्यानंतर त्यांनी अलीकडेच देशाची सूत्रे हाती घेतली. दुसरीकडे, यापूर्वी कोलंबोमध्ये हजारो आंदोलकांनी पोलिस बॅरिकेड्स तोडले आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानावर कब्जा केला. 22 दशलक्ष लोकसंख्येचे राष्ट्र असलेल्या श्रीलंकेतील सध्याच्या परिस्थितीचा अंदाज यावरून लावता येतो की, राष्ट्रपती गोयबाया यांनी राजपक्षे कुटुंबासह राष्ट्रपती भवन सोडले आहे. एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये श्रीलंकन ​​मीडिया दावा करत आहे की सरकारी कर्मचारी नौदलाच्या जहाजात राष्ट्रपतींचे सूटकेस ठेवत आहेत. ते सध्या कुठे आहेत याचा खुलासा झालेला नाही.

To ensure the continuation of the Government including the safety of all citizens I accept the best recommendation of the Party Leaders today, to make way for an All-Party Government.

To facilitate this I will resign as Prime Minister.

— Ranil Wickremesinghe (@RW_UNP) July 9, 2022

रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असला तरी, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे केव्हा पायउतार होतील याबाबत अजूनही शंका आहे. आंदोलक राजपक्षे यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. पण, तो स्वत: कुठे आहे, हे माहीत नाही. राष्ट्रपतींना वाचवण्यासाठी त्यांना गुप्त ठिकाणी ठेवण्यात आल्याचा दावा सुरक्षा सूत्रांनी केला आहे. राजपक्षे यांनी राजीनामा देण्याचे बोलले पण, ते आतापर्यंत सत्तेत आहेत.

राजीनामा देण्यापूर्वी विक्रमसिंघे यांनी तातडीची बैठक बोलावली होती. ज्यामध्ये त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याची ऑफर दिली होती. या ऑफरनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्यानंतर देशात सर्वपक्षीय सरकार स्थापनेसाठी कोणती पावले उचलली जातात, हे पाहणे बाकी आहे.

Srilanka Financial Crisis PM Ranil Wickremesinghe resigns

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शैक्षणिक प्रवेश घ्यायचा आहे? तातडीने हे वाचा

Next Post

जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करतात (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
cm amravati 750x375 1

जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करतात (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011