बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पुणे विद्यापीठात अश्लील रॅप सॉंगचे शुटींग; धक्कादायक माहिती उघड

by Gautam Sancheti
एप्रिल 21, 2023 | 2:07 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
pune univercity

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यात असलेले आणि शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अश्लील गाण्याचे शूटिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शुभम जाधव या तरुणांवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रॉकसन नावाचे यूट्यूबवर चॅनेल असून त्यावर हे रॅप गाणे अपलोड करण्यात आले होते. या गाण्यांमध्ये शुभम जाधव हा गाण्याचे सादरीकरण करतो आहे. शुभम जाधवचं हे रॅप साँग काही दिवसांच्या आधी व्हायरल झाले. त्या गाण्यात काही शिवराळ शब्दांचा वापर करण्यात आला आहे. तर काही दृश्यांमध्ये शुभमच्या हातात पिस्तूल आणि तलवार सारखी हत्यार दिसत आहे. अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे काही दृश्यांमध्ये विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधल्या एका खोलीत आलिशान खुर्च्यांवर बसून शुभम रॅप म्हणत आहे. सदर गाणे व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या विद्यार्थी शाखेकडून विद्यापिठाला एक पत्र लिहिण्यात आलं आणि अशा प्रकारचे शुटिंग करायला विद्यापीठाने परवानगी कशी दिली यासंदर्भात विचारणा करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप गाणे चित्रीत केल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजी पोलीस महासंचालक डॉ. जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी समितीला दिले.

विशेष म्हणजे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या पार्श्वभूमीवर आणि अंतर्गत भागात चित्रीत केलेल्या सल्तनत या गाण्यात मद्य, पिस्तुल, तलवार अशा साहित्याचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. रॅप शैलीच्या या गाण्यात शिव्या आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर असल्याची कुलगुरूंकडे लेखी तक्रार नोंदवली गेली असून विद्यापीठाने या गाण्याच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी विद्यापीठाकडून पोलिसात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या संदर्भात विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्य शासन आणि राज्यपालांकडे पत्र पाठवले आहे, अजित पवार आपल्या पत्रात म्हणतात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आणि विद्यापीठ वास्तुला फार मोठा इतिहास आहे. असे असताना या विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत, अधिसभा भरते त्या ठिकाणी अश्लील भाषेतील रॅप सॉंगचे शूटिंग झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेची शासन स्तरावर दखल घेण्यात यावी.

याच प्रकरणात धक्कादायक बाब अशी की, या गाण्यात जो आगीचा सीन आहे. हा सीनदेखील पुणे विद्यापीठातील परिसरात शुट केल्याचे समोर आले आहे. आग वाढल्याने अग्निशमन दलाला बोलवण्याची वेळ विद्यापीठ प्रशासनावर आली होती. मात्र इतका गंभीर प्रकार घडून देखील गाणं व्हायरल झाल्यावर हा सगळा प्रकार समोर आला. रॅपर शुभम यानेदेखील शुटींगसाठी कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी तोंडी परवानगी दिल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता दोघांचीही सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

https://twitter.com/ShashiBelgawakr/status/1647121518491734016?s=20

SPPU Pune University Rap Song Shooting

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान शिर्डीला हे दान झाले डोईजड; बँकांचाही स्वीकारण्यास नकार… काय आहे हा प्रकार?

Next Post

मुख्यमंत्री वॉर रुमशी निगडीत सर्वच प्रकल्पांचे काम संथगतीने; एकनाथ शिंदे म्हणाले…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Untitled 8
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यात अडीच तास चर्चा…दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होणार?

सप्टेंबर 10, 2025
Untitled 7
महत्त्वाच्या बातम्या

समृध्दी महामार्गावर रस्त्यावर खिळे, गाड्या पंक्चरमुळे गाड्यांची रीघ

सप्टेंबर 10, 2025
Screenshot 20250910 114142 Collage Maker GridArt
संमिश्र वार्ता

मालेगावमध्ये शिक्षक भरती घोटाळा…तीन शिक्षण अधिका-यांना अटक

सप्टेंबर 10, 2025
Next Post
8.47.56

मुख्यमंत्री वॉर रुमशी निगडीत सर्वच प्रकल्पांचे काम संथगतीने; एकनाथ शिंदे म्हणाले...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011