मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वर्ष २०२२ संपायला अवघे दोन-तीन दिवस उरले असून नव्या वर्षाला प्रारंभ होणार आहे. नवा गडी नवे राज्य अशी एक म्हण आहे त्यालाच अनुसरून क्रिकेट मध्यआता नव्या वर्षात नवा कोच अशी टीम इंडिया साठी घोषणा होऊ शकते. जानेवारी महिन्यात टीम इंडियाला नवा कर्णधार आणि नवा टी-२० सेटअप मिळेल. नवी निवड समितीची लवकरच घोषणा होईल.
नवी समिती नव्या जबाबदारीची घोषणा करू शकते. नवा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे संघाचे मुख्य कोच राहुल द्रविड यांना फक्त वनडे आणि कसोटी सामन्यावर फोकस करण्यास सांगितले जाऊ शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका सूत्राने सांगितले की, आम्ही यावर गांभीर्याने विचार करत आहोत. राहुल द्रविडच्या संघाच्या व्यस्त वेळापत्रकात संघाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नव्या वर्षात टी-20 क्रिकेटचे व्यस्त कॅलेंडर पाहता संघात बदलाची गरज आहे. मी पुष्टी करू शकतो की भारतीय संघाला लवकरच टी-20 मध्ये नवीन कोचिंग सेटअप मिळू शकेल. विशेष म्हणजे बीसीसीआय कोणाला टी-20 प्रशिक्षक बनवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या पदासाठी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव पुढे आहे. तसेच एका विश्वसनीय सूत्राने यापूर्वी सांगितले होते की, ‘रोहित शर्मा कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. रोहितकडे सध्या खूप काही देण्यासारखे आहे असे आपल्या सर्वांना वाटते. आम्हाला आतापासूनच २०२४ च्या टी-20 वर्ल्डकपची तयारी करावी लागेल. या भूमिकेसाठी हार्दिक फिट आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी हार्दिक पांड्याला टी-20 चा कर्णधार म्हणून अधिकृतपणे घोषित केले जाईल.
खरे म्हणजे प्रमुख खेळाडूंना टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. टी20 मध्ये नवीन दृष्टीकोनातून संघ बांधणी करण्यासाठी युवा खेळाडूंना संधी दिलीय. टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टी 20 क्रिकेटमध्ये अमूलाग्र बदल करण्याचे संकेत बीसीसीआयने दिले होते. त्यामुळे बीसीसीआयने श्रीलंके विरुद्धच्या टी20 आणि वनडे सीरीजसाठी टीम जाहीर केली. टी 20 सीरीजसाठी संघ जाहीर करताना, बीसीसीआयने हार्दिक पंड्याची टी20 टीमच्या कॅप्टनपदी निवड करण्यात आली. आता कोचिंगमध्येही बदल करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. टी20 मध्ये राहुल द्रविड यांचा पर्याय शोधण्यास बीसीसीआयने सुरुवात केली आहे. परदेशी प्रशिक्षकाचाही विचार होऊ शकते. क्रिकेट सल्लागार समिती (CAC) बरोबर चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. मात्र अजून काही अंतिम ठरलेले नाही, असे सांगण्यात येते.
Sports BCCI Indian Cricket Team Coach Rahul Dravid