India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

जगात शस्त्रक्रियांमध्ये नंबर एक कोण? नाशिक का लंडन? अशी आहे नाशिकच्या वैद्यकीय पर्यटनाची सद्यस्थिती

India Darpan by India Darpan
December 29, 2022
in विशेष लेख
0

इंडिया दर्पण विशेष लेखमाला 
– व्हिजन नाशिक – 
वैद्यकीय पर्यटनाचे केंद्रस्थान नाशिक

विविध क्षेत्रांबरोबरच नाशिक हे वैद्यकीय पर्यटनातही अग्रेसर बनले आहे. यासंदर्भातील माहिती जाणून घेतल्यावर असा प्रश्न पडतो की, जगात सर्वाधिक शस्त्रक्रिया नाशिकमध्ये होतात की लंडनमध्ये. हो तुम्ही बरोबर वाचत आहात. चला, तर वेळ न दवडता आपण सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊया…

श्री पियूष सोमाणी
ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.
Email ID: [email protected]
WhatsApp: 9011009700

आपल्या नाशिक शहरांत असे काही तज्ञ डॉक्टर्स आहेत की ज्यांचेकडे पेशंट्स केवळ भारतातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशांमधील वेगवेगळ्या देशांमधून सुद्धा येतात आणि शस्रक्रिया करवून घेतात. नाशिक मध्ये चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अपघात झाल्याने प्रख्यात अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड, ऐश्वर्या रॉय हिने नाशिकचेच डॉक्टर विजय काकतकर ह्यांचे कडे प्लास्टर करवून घेतले होते. अस्थिरोग तज्ञ डॉक्टर काकतकर ह्यांचे कडे अनेक नामवंत लोकांनी उपचार करवून घेतले आहेत. तसेच डॉ. प्रशांत पाटील, डॉ. योगेश चौधरी, डॉ. अखिल चौधरी इत्यादी वरिष्ठ डॉक्टरांकडे सुद्धा शेकडो रुग्णांनी आपले उपचार करवून घेतले आहेत. नाशिक मध्ये शस्रक्रियेचे काही रेकॉर्ड सुद्धा झालेले आहेत, जसे की दोन्ही गुडघ्याच्या वाटीचे यशस्वीपणे ऑपरेशन झालेल्या पेशंटने ४८ तासांमध्ये चालायला सुरुवात केलेली आहे. असा पराक्रम आपल्या नाशिकच्या डॉक्टरांनी केलेला आहे आणि मेडिकल क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलेले आहे. इतर कुठल्याही देशामध्ये असे तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ तुम्हाला सापडणार नाहीत.

हार्ट ट्रान्सप्लांट, हार्ट सर्जेरी आणि हृदयाच्या कुठल्याही समस्येवर यशस्वीपणे उपचार करणारे आपल्या नाशिकचे लोकप्रिय डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. मनोज चोपडा, डॉ. विनोद विजन इत्यादी अनेक डॉक्टरांकडे देशविदेशातून रुग्ण हार्ट सर्जरीसाठी येतात. नाशिकच्या आल्हाददायक वातावरणात राहून पेशंट्स आपले उपचार करून घेतात. काही दिवस मुक्कामी देखील राहतात, त्यांचा प्रवास, उपचार आणि मुक्कामाचा खर्च इतर शहरांच्या तुलनेत कित्येक पटीने कमी आहे आणि गुणवत्ता अगदी उत्तम आहे.

कॅन्सर अर्थात कर्करोग हा जीवघेणा आणि गंभीर आजार आहे. चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अनियंत्रित वजन, आनुवंशिकता आदी कारणं कॅन्सरला कारणीभूत ठरत असल्याचं सांगितलं जातं. कॅन्सर म्हणजे मृत्यू असं समीकरण सर्वसामान्यपणे जनमानसात रुजल्याचं दिसून येतं; मात्र कॅन्सर हा गंभीर आजार असला तरी त्याचं लवकर निदान झाल्यास आणि तातडीनं उपचार सुरू झाल्यास तो नियंत्रणात येऊ शकतो. कॅन्सर वरील उपचार ही तशी खर्चिक बाब परंतु आपल्या नाशिक चे डॉ. राज नगरकर यांनी आपल्या कार्यशैलीने जगभरातील कॅन्सर रुग्णांवर नाशिक मध्येच यशस्वी उपचार करीत आहेत. मानवता कॅन्सर सेंटर मध्ये आफ्रिका, यूरोप, मध्य पूर्व देशांमधून कॅन्सर रुग्ण उपचारासाठी येत असून परदेशातील डॉक्टर्स सुद्धा त्यांचेकडे शिकण्यासाठी येत आहेत.

आपल्याकडे डॉ. प्रदीप पवार, डॉ. निवेदिता पवार, डॉ. रणजित जोशी आणि इतर अनेक स्त्रीरोगतज्ञ आहेत जे त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगले काम करीत आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा मार्गदर्शन, डिलिव्हरी आणि उपचारासाठी पेशंट्स संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, आणि उत्तर महाराष्ट्रातून येत असतात. बऱ्याच पालकांची अशी इच्छा असते की आपल्या बाळाचा जन्म नाशिक मध्ये झाला पाहिजे. नाशिक मेडिकल टुरिझमसाठी तर उत्तर महाराष्ट्राची राजधानी झाली आहे.
नाशिकमध्ये “बोन मॅरो ट्रान्सप्लांट”चेही केंद्र असून त्याचा फायदा कॅन्सरग्रस्तांसह थॅलेसेमिया, सिकलसेल अनेमिया, लिम्फोमा यांसारख्या रक्तदोष असलेल्या रुग्णांना मिळत आहे, ह्या क्षेत्रामध्ये आपल्या नाशिकचे हेमॅटॉलॉजी आणि ऑनकॉलॉजी तज्ञ डॉ. प्रितेश जुनागडे ह्यांनी सुद्धा शेकडो रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत, शिवाय इतर अनेक डॉक्टर्स सुद्धा खूप चांगले काम करीत आहेत.

साधारण दहा वर्षांपूर्वी आपल्या येथील रुग्ण कॅन्सर किंवा इतर गंभीर आजारांवर उपचारांसाठी परदेशामध्ये जात असत आणि आता आपल्या नाशिक मध्ये “मेडिकल ट्रीटमेंट्स” साठी जगभरातून माणसे येत आहेत आणि यशस्वी उपचार घेऊन पुन्हा आपल्या गावी आनंदाने जात आहेत. नाशिक मध्ये वोक्हार्ट, अपोलो, अशोका मेडिकव्हर, साईबाबा हार्ट इन्स्टिटयूट, मॅग्नम हार्ट, सुयश, संकल्प, सह्याद्री, विजन रिसर्च, सिक्स सिग्मा, नारायणी, डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, एसएमबीटी, इत्यादी अनेक सुपर स्पेशीयालिटी हॉस्पिटल्स उत्कृष्ट रुग्णसेवा देत आहेत. नाशिकच्या डॉक्टर्सचे जगभरात नाव, कौतुक आणि मानसन्मान होत आहेत. हे प्रगतीचे लक्षण असून नाशिकचा प्रवास आता “मेडिकल टुरिझम हब” च्या दिशेने होत आहे.

नाशिकच्या दातार कॅन्सर जेनेटिक्स लिमिटेड कंपनीने स्तनांच्या कर्करोगाचं (ब्रेस्ट कॅन्सर) प्राथमिक अवस्थेतच निदान होऊ शकेल, अशी रक्तचाचणी विकसित केली आहे. विशेष म्हणजे भारतीय कंपनीच्या या संशोधनाला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन तर्फे (एफडीए) पेटंट देखील मिळालं आहे. तब्बल २० हजारांहून अधिक महिलांवर क्लिनिकल चाचण्या करून दातार जेनेटिक्सनं हे संशोधन केलंय. अगदी प्राथमिक अवस्थेतच रक्त तपासणीद्वारे महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करणं आता शक्य होत असून ह्या संशोधनामुळं हजारो महिलांना जीवनदान मिळणार आहे. त्यासाठी दातार जेनेटिक्सचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे.

दंत वैद्यकीय उपचारासाठी तर नाशिक प्रसिद्ध झाले असून “डेंटल ट्रान्सप्लांट” साठी जागतिक दर्जाची आणि अत्यंत वाजवी दरात रुग्णसेवा दिली जात आहे. माझ्या दुबई आणि युरोपातून आलेल्या काही मित्रांच्या अनुभवानुसार परदेशातील हॉस्पिटलच्या तुलनेत, डेंटल सर्जरी साठी आपल्या नाशिक मध्ये ९०% पर्यंत कमी खर्चांमध्ये रुग्णांवर उपचार होत आहेत. ह्या क्षेत्रामध्ये डॉ. मिलिंद सौदागर, डॉ. नागेश डोलारे आणि इतर बरेच अनुभवी डॉक्टर्स खूप चांगले काम करीत असून नाशिक मध्ये ऑर्थोडेंटिक केयर, स्माईल डिझाईन, इम्प्लांट, मल्टि स्पेशियालिटी क्लिनिकल सेंटर्स असून उत्कृष्ट सेवा देत आहेत.

नाशिकमधील आल्हाददायक वातावरणामुळे रुग्णास आणि त्यांच्या नातेवाईकांना येथे काही दिवस राहावेसे वाटते. त्या निमित्ताने परिसरातील रिसॉर्ट्स, आरोग्यधाम, मंदिरे, गड-किल्ले, डॅम, धबधबे, वाईनरी प्रकल्प, मिसळ साठी प्रसिद्ध हॉटेल्स, इत्यादी विविध स्थळांना भेट हि दिली जाते त्यामुळे नाशिककरांना पर्यटन, रोजगार आणि व्यवसाय वाढीच्या नवनवीन संधी सुद्धा उपलब्ध होत आहेत. नाशिक मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण जर “अतिथी देवो भव” ह्या विचाराने चांगली वागणूक दिली तर आनंदाने परतणारा रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ह्यांच्या मनात नाशिककरांबद्दल नक्कीच कृतज्ञतेचे भाव असतील. ह्या शिवाय आपण सर्वानी जर आपल्या तज्ञ डॉक्टरांवर विश्वास ठेवून त्यांना “मेडिकल टुरिजम हब” साठी सकारात्मकतेने सहकार्य केले तर नाशिकचा नावलौकिक नक्कीच वाढेल आणि नाशिक “सर्जरी कॅपिटल ऑफ द वर्ल्ड” म्हणून नक्कीच नावारूपास येईल.

आपल्या सूचना, अभिप्राय आणि प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
पियुष सोमाणी
ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.
Email ID: [email protected]
WhatsApp: 9011009700

Column Vision Nashik Medical Tourism by Piyush Somani


Previous Post

शाओमी इंडियाची 5G नेटवर्कबाबत मोठी घोषणा

Next Post

राहुल द्रविड प्रशिक्षकपदी राहणार की जाणार? बीसीसीआयकडून हालचाली सुरू

Next Post

राहुल द्रविड प्रशिक्षकपदी राहणार की जाणार? बीसीसीआयकडून हालचाली सुरू

ताज्या बातम्या

Good News! डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आता या सरकारी योजनेचा लाभ

February 1, 2023

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group