व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… राशीनुसार पितृदोष कसे दूर करावेत?

India Darpan by India Darpan
October 3, 2023 | 5:06 am
in इतर
0

पितृपक्ष महात्म्य :
राशीनुसार पितृदोष कसे दूर करावेत?

पितृ पक्षात आपल्या पितरांना मुक्ती मिळावी यासाठी सर्वजण धार्मिक विधि करतात. या काळात विविध राशिंच्या व्यक्तींनी पितृदोष दूर कसे करावेत तसेच पितृपक्षांत कोणत्या गोष्टी करू नयेत हे आज जाणून घेऊ या.

विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

मेष
पितृदोषापासून मुक्तीसाठी पूजा स्थळी श्री हनुमान यंत्राची स्थापना व तंत्रोक्त हनुमान साधना करावी.यासाठी कल्याणकारी मंत्र –
।।ॐ घण्टाकर्णों महावीर सर्व उपद्रव नाशन कुरु कुरु स्वाहा।।

वृषभ
आपल्या द्वितीयेला निवास स्थळी पितृयज्ञ करायला हवा तसेच पितृपक्षांत चूल, चक्की, झाडू, खल आणि पाठी ठेवत असलेल्या जागेवर जीव हत्या होता कामा नये.

मिथुन
या राशीच्या जातकांनी पितृ दोष समाप्तीसाठी तृतीयेला तर्पण करावे.

कर्क
आपल्याला पितृपक्षात दररोज शांती स्तोत्र पाठ करायला हवा. यात २७ श्लोक आहे ज्यातून २२, २३, आणि २४ वा श्लोकाचे पाठ तीनदा करावे. पितृ बीसा पाठ केल्याने देखील या दोषापासून मुक्ती मिळेल.

सिंह
कुंडलीत पितृ दोष असल्यास शाबर मंत्राचा जप करावा. पितृपक्षात दररोज हा जप करता येईल.

कन्या
पितृ शांतीसाठी आपल्याला अद्भुत चमत्कारी श्रीमद्भागवत गीता मधील ११ व्या अध्यायाचा पाठ केला पाहिजे. पाठ करण्यापूर्वी लाकडाच्या पट्टीवर पांढरा कापड पसरवून त्यावर तुपाचा दिवा लावावा.

तूळ
या जातकांनी पितृपक्षात दररोज पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. याने पितृदोषाचा दुष्प्रभाव दूर होईल.

वृश्चिक
पितृदोष दूर करण्यासाठी विशिष्ट प्रकारे हनुमान बाहुक याचा ३२वा, ३३वा व ३८वा पद नियमित रूपाने वाचायला हवा.

धनू
पितृ दोष निरसन आपल्याला कुंडलीत तेव्हाच होईल जेव्हा आपण हनुमान बाहुक घनाक्षरीचा उपयोग पितृपक्षात कायदेशीर कराल.

मकर
कुंडलीत पितृ दोष असल्यास सव्वा मीटर पांढर्‍या कपड्याच्या कोपर्‍यात दोन रुपयाचा शिक्का आणि चिमूटभर तांदूळ ठेवावे. कपड्याच्या मधोमध नारळ ठेवून घरातील पूजा स्थळी ठेवावे आणि पितृपक्षात याची पूजा करावी.

कुंभ
कुंडलीत पितृदोष असल्यास घरात पितरांसाठी दररोज दिवा आणि उदबत्ती जाळायला हवी. सोबत ॐ पितृय: नम: मंत्राचा २१ वेळा जप करायला हवा.

मीन
कुंडलीत पितृदोष असल्यास पितृपक्षात दररोज तांब्यात पाणी घेऊन त्यात श्वेतार्क फूल घालून सूर्याला अर्घ्य द्यावे.

पितृपक्षात या गोष्टी चुकुनही करू नका
१) पितृपक्षात दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. पितर कोणत्याही रूपात दारावर येऊ शकतात म्हणून प्रत्येक जीवाचा आदर करावा.
२) या दरम्यान कोणत्याही पशू- पक्ष्यांना त्रास देऊ नये किंवा जखमी करू नये. विशेष म्हणजे गायीचा अपमान करू नये. पशू-पक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे.
३) ब्रह्मचर्याचे पालन करावे. तसेच आहारात मांसाहार टाळावा व दारूचे सेवन करू नये.
४) पितृपक्षात शिळं अन्न खाऊ नये. तसेच चणे, मसूर, साग, सातू, जिरं, मुळी, काळं मीठ, काकडी आणि दुधी भोपळा खाणे टाळावे.
५) पितृपक्षात श्राद्ध स्वत:च्या घरात किंवा गया, प्रयाग, बद्रीनाथ आणि इतर स्थळी श्राद्ध करू शकता परंतू दुसर्‍यांच्या घरी श्राद्ध करणे योग्य नाही.
६) पितृपक्षात झाडं कापू नये. याने पितरं नाराज होऊ शकतात.
७) सात्त्विक आणि धार्मिक विचारांच्या ब्राह्मणाला केवळ मध्याह्न दरम्यान भोजन करवावे.
८) श्राद्धाचा प्रसाद घेतल्यावर या दिवशी घरात दुसर्‍यांदा भोजन निषिद्ध आहे.
९) पितृपक्षात नवीन वस्त्र धारण करू नये. नवीन वस्त्र किंवा वस्तू खरेदी करू नये.
१०) खोटे बोलणे, अनैतिक काम करणे, कोणासाठी वाईट विचार मनात ठेवणे चुकीचं ठरेल.

(छायाचित्र व संदर्भ सौजन्य विकिपीडिया आणि धार्मिक ग्रंथ)


Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – चिंट्याचे मित्र आणि आईला फर्माईश

Next Post

मालेगाव उपनिबंधक कार्यालययातील उपनिबंधक यांचा कार्यभार काढला… मालेगाव लँड जिहाद प्रकरण

Next Post

मालेगाव उपनिबंधक कार्यालययातील उपनिबंधक यांचा कार्यभार काढला… मालेगाव लँड जिहाद प्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिकच्या डिफेन्स पार्कसाठी राज्य शासनाकडून केंद्राला शिफारस….खा.गोडसे यांनी दिली ही माहिती

November 29, 2023

बीसीआयची मोठी घोषणा….राहुल द्रविडच भारतीय संघाचा मुख्य कोच राहणार…बदलाच्या चर्चेला दिला पूर्णविराम

November 29, 2023

चांदवड तालुक्यात बाळासाहेब थोरात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर…सरकारवर केली ही टीका

November 29, 2023

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे राज्य शासनाने घेतले हे विविध महत्त्वपूर्ण निर्णय

November 29, 2023

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून….वादळी चर्चा, आंदोलन व घोषणांचा पाऊस

November 29, 2023

नाशिक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन….५६८ सार्वजनिक ठिकाणी मद्यपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल (बघा व्हिडिओ)

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.