गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मेस्सी होणं सोपं नाही… अतिशय गंभीर आजार… वयाच्या ११ वर्षापासून पायात इंजेक्शन घेणं… अथक परीश्रम.. एकदा ही जीवनकहाणी वाचाच

by India Darpan
डिसेंबर 21, 2022 | 12:15 pm
in इतर
0
Lionel Messi 1

इंडिया दर्पण विशेष लेख
– पॅव्हेलिअन –
लिओनेल मेस्सीची जीवन कहाणी

आपणही जगात नामवंत व्‍हावं किंवा एक नंबर व्‍हावं असे वाटत असेल तर काय करायला पाहिजे? लिओनेल मेस्सी नावाच्‍या अवलियाची जीवन कहाणी वाचा. तुम्‍हाला या प्रश्‍नाचे उत्तर सापडेल. मेस्सीला फुटबॉलच्‍या मैदानावर पळतांना बघून आपल्‍याला हेवा वाटतो. फुटबॉलला मैदानातल्‍या या कोपऱ्यातून त्‍या कोपऱ्यात लाथाळत नेताना तो त्‍याच्‍या पायाने जे काही कसब वापरतो त्‍याचे आश्‍चर्य वाटते. परंतु, एका दुर्धर आजारावर मात करण्‍यासाठी याच पायांवर मेस्सीला वयाच्‍या ११-१२ व्‍या वर्षापासून सतत तीन वर्ष रोज रात्री इंजेक्‍शन घ्‍यावे लागले. हे वाचतांना तुमचा तुमच्‍यावरचाच विश्‍वास उडून जाईल. मेस्सीच्या या जीवनकहाणी सांगत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे…

मेस्सी एका सर्वसामान्‍य कुटुंबात जन्‍माला आलाय. त्‍याच्‍या घरात फुटबॉलवर प्रेम करणारी माणसं होती आणि मग नैसर्गिकरित्‍या तो या खेळाकडे खेचला गेला. वडिलांनी त्‍याला वयाच्‍या पाचव्‍या वर्षीच फुटबॉल खेळायला पाठवलं. लिओनेल….. आपल्‍याकडे पटकन कुणीतरी चंद्रकांतचा ‘चंदू’ करावा तसं लिओनेलचा लिओ झाला तेव्‍हा या पोराच्‍या शरीरात अपेक्षेप्रमाणे वाढ होत नसल्‍याचे घरच्‍यांच्‍या लक्षात आलं. इतर सहकारी मुलांच्‍या तुलनेत त्‍याची उंची वाढेना, वजनही वाढेना. मग वयाच्‍या ११ व्‍या वर्षी डॉक्‍टरांनी ग्रोथ हार्मोन्‍स डेफिशिअन्‍सी, अर्थात त्‍याला शरीरातल्‍या हार्मोन्‍स वाढीची कमतरता असल्‍याचं निदान केलं. एखाद्याची कारकीर्द जागेवर संपवणारी ही बातमी होती. परंतू, घरातून पाठिंबा असला की कुणी संपत नाही; तेच झालं. हार्मोन्‍स वाढीसाठी रोज रात्री लिओच्‍या पायात इंजेक्‍शन सुरू करण्‍यात आलं. हा उपचार ११ वर्षाच्‍या लहानग्‍यासाठी वेदनादायी तर होताच परंतु, त्‍याचबरोबर मध्‍यमवर्गीय गटातल्‍या बापाच्‍या खिशाला न परवडणारा देखील होता. परंतु, लिओच्‍या घरच्‍यांनी माघार घेतली नाही.

दरम्‍यान, मेस्सीचा फुटबॉल बहरत चालला होता. त्‍याला वयाच्‍या १३ व्‍या वर्षी बार्सिलोना एफ.सी. या फुटबॉल क्‍लबने करारबध्द केलं. त्‍याच्‍या आजाराबद्दल सर्व काही माहिती असून देखील या क्‍लबने हिम्‍मत दाखवली. त्‍याच्‍या वैद्यकीय खर्चाची सगळी जबाबदारी उचलली आणि सुरूवातीपासूनच त्‍याच्‍या मागे असलेल्‍या त्‍याच्‍या कुटूंबाने या क्‍लबतर्फे मेस्सीला खेळणे सोप्पे व्‍हावे म्हणून स्‍पेन गाठलं. एक कारकीर्द सुरू होण्‍याअगोदरच संपणार होती परंतु, मेस्सीच्‍या आयुष्‍याला बार्सिलोना एफ.सी. क्‍लबच्‍या या कराराने कलाटणी मिळाली. वयाच्‍या १७ व्‍या वर्षी मेस्सीने या क्‍लबतर्फे लीगमध्‍ये सर्वात कमी वयात गोल करण्‍याचा विक्रम साधला. तेव्‍हापासून सुरू असलेला हा गोलचा उतार चढाव प्रवास अगदी परवा फ्रान्‍सविरूद्ध झालेल्‍या विश्‍वचषकाच्‍या अंतिम सामन्‍यापर्यंत सुरूच आहे. तो आता थांबणार अशी लोकांनाच घाई झाली होती, परंतु मी अजूनही खेळणार आहे अशी घोषणा करून मेस्सीने मैदानाबाहेर देखील गोल केला आहे.

आपल्‍याकडे इतक्‍या लहान वयात असा गंभीर आजार कुणाला झाला असं समजलं तरी त्‍याला घराचा उंंबरठा ओलांंडू देणार नाहीत. परंतु, मेस्सीला घडायचं होतं आणि त्‍याला त्‍याच्‍या कुटूंबाची साथ होती. परिसस्‍पर्श हा शब्‍द आपण फक्‍त ऐकलाय. लोखंडाला परिसाचा स्‍पर्श झाला की त्‍याचे सोने होते असे म्‍हणतात. मैदानात फुटबॉलला मेस्सीच्‍या पायाचा स्‍पर्श जरी झाला तरी परिसस्‍पर्श कसा असू शकेल याची अनुभूती मिळते. पुढे मग तो बॉल असंख्‍य अडथळ्यांची शर्यत पार करून गोलकिपरला चकमा देत जाळीवर आदळतो आणि
सोन्‍याचा होवून जातो. ही इतकी दिमाखदार शैली जपणारा मेस्सी जिद्द आणि परीश्रमाच्‍या मुशीत घडलाय हेच खरं.

मध्‍यंतरी माझ्या एका आंतरराष्‍ट्रीय क्रिडाप्रशिक्षक मित्रासोबत खेळावर चर्चा करीत असतांना त्‍याने एक खंत बोलून दाखवली होती. तो म्‍हणाला आपल्‍याकडे खेळात खुप चांगले टॅलेन्‍ट आहे परंतु अगदी लहानपणापासून अतिशय चांगले शिकणारे खेळाडू दहावी-बारावीला पोहोचले की, त्‍यांच्‍या घरचे लोक अभ्‍यासापायी त्‍यांचे पुढचे प्रशिक्षण बंद करतात. आपल्‍याकडल्‍या अशा पालकांनी खरेतर लिओनेल मेस्सीच्‍या जीवनगाथेचे पारायणच केले पाहिजे.

१९८६ साली अर्जेन्‍टिनाने दुसरा विश्‍वचषक जिंकला आणि त्‍यानंतर पुढच्‍या वर्षी म्‍हणजे २४ जून १९८७ ला मेस्सीचा जन्‍म झाला. ३६ वर्षांनी अर्जेन्‍टिनाला पुन्‍हा विश्वविजेतेपदाचा आनंद मिळालाय तो केवळ मेस्सीमुळे. १९७८ साली अर्जेन्‍टीनाने पहिल्‍यांदा विश्‍वचषक जिंकला. तेव्‍हा संघात पासारेलाचा दबदबा होता. १९८६ साली दिएगो मॅराडोनाची जादू चालली आणि आता २०२२ ला मेस्सीची. अर्थात, मेस्सीला यासाठी पाच विश्‍वचषक सामन्‍यात घाम गाळावा लागलाय, हे देखील विसरून चालणार नाही. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर दरवर्षी सर्वोत्‍कृष्‍ट फुटबॉलपटूंना फ्रान्‍समधील जगप्रसिद्ध बॅलन डी’ओर नावाच्‍या मॅगेझिनतर्फे पुरस्‍कार दिला जातो. जसं आतराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये सर्वोत्तम ठरण्‍यासाठी विस्‍डेन मासिकाच्‍या पुरस्‍काराची खेळाडूंना ओढ असते तीच ओढ फुटबॉलमध्‍ये बॅलन डी’ओर पुरस्‍काराची आहे. मेस्सीला हा किताब सर्वाधिक ७ वेळेला मिळालाय आणि त्‍याच्‍या खालोखाल नंबर लागतो तो रोनाल्‍डोचा.

मेस्सी खुप मोठा खेळाडू आहे. विश्‍वविजेत्‍या संघाचा कर्णधार ठरल्‍यानंतर तर तो अधिकच मोठा झालाय. मेस्सीचा खेळ अनुभवण्‍यात मजा आहे. तो असा नुसता शब्‍दात मांडून दाखवणे अवघड आहे. असे खेळाडू घडायला वर्षानुवर्ष लागतात. आपण मेसीच्‍या ऐन भरातल्‍या खेळाचे प्रेक्षक आहोत हे आपले भाग्यच.

Special Article on Lionel Messi Life Journey Success Story by Jagdish Deore
Football FIFA Argentina

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील शासकीय रुग्णालयांची स्थिती गंभीर; अजित पवार यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारला धरले धारेवर

Next Post

महात्मा गांधी हे जुन्या तर नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता – अमृता फडणवीस

India Darpan

Next Post
amruta fadanvis e1655017727388

महात्मा गांधी हे जुन्या तर नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता - अमृता फडणवीस

ताज्या बातम्या

doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011