गारपीट म्हणजे काय?
की का होते?
हवामानात बदल झाल्यानंतर अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतो. त्याचबरोबर गारपीटही होते. ही गारपीट म्हणजे काय, ती का होते, असे प्रश्न अनेकांना पडतात. आज आपण त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया..

हवामानतज्ज्ञ
जेव्हा ईशान्य मान्सुन हंगामात उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत असते, त्यामुळे देशात वाऱ्यांचा प्रवाह हा ठरल्याप्रमाणे ईशान्येकडून नैरुकतेकडे असतो. परंतु ह्या ईशान्य मान्सुन हंगामात (उत्तर भारतात थंडी तर दक्षिणेत पाऊस) ही वाऱ्याची दिशा कधी कधी मधेच एकाकी कमी कालावधीसाठी विसंगत वाहु लागते.
सदरच्या काळात उत्तर भारतातील अक्षवृत्तवरील हवेचे उच्चं दाबाचे क्षेत्रे म्हणजे प्रत्यावर्ती चक्रीवादळे (चक्रीवादळ वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे घड्याळ्य काट्याच्या दिशेने चक्रकार वारे) त्यांची व्यापकता वाढून देशात अधिक दक्षिणेकडील अक्षवृत्तपर्यन्त किंवा अधिक खाली( गुजराथ, म. प्रदेश महाराष्ट्रपासुन अरबी समुद्र) पर्यंत पोहोचतात. तेंव्हा वारे जमिनीवरून समुद्रात घुसतात व रहाटगाडग्याप्रमाणे समुद्रातून आर्द्रता महाराष्ट्र व सभोंवताल भागात ओतत असतात.
हा वाऱ्याचा प्रवाह जेंव्हा तीव्र होतो व त्याच वेळेस जर वातावरणातील काही बदलानुसार जर उलट दिशेने म्हणजेच नैरुकतेकडून वारे अरबी समुद्रातून बाष्प घेऊन उलट दिशेने ईशान्येकडे निघतात, तेंव्हा त्या दोघांची (थंड वारे व बाष्पयुक्त वारे यांची ) टक्कर होऊन त्यांचा प्रवाह हा ऊर्ध्वगामी होतो व फारच कमी उंचीवर पोहोचतो. ह्या उंचीवर वातावरणीय अस्वस्थता (ऍटमोस्फेरिक इनस्टेबिलि टी) घडून येते. वातावरण हा भार मोकळा होण्याचा प्रयत्न करते. त्यांचे ह्या पोहोचताच समुद्रावरून आलेली प्रचंड उपलब्ध आर्द्रता आणि साथीला उत्तर भारतातून आलेली अति बर्फळ थंडी ह्यातून कमी उंचीवरच सांद्रीभवन घडून येते-न – तेच घनीभवन होते म्हणजेच डायरेक्ट द्रविकरणाची स्टेज लगेचच ओलांडून बर्फाच्या तुकड्यात त्याचे रूपांतर होते.
https://twitter.com/SkymetWeather/status/1636968802452918272?s=20
आता त्यांच्या वजनामुळे त्यांचा प्रवास हा जमिनीच्या दिशेने सुरु होतो. हवेच्या घर्षणाने बर्फाचे द्रवात म्हणजे पावसाच्या थेंबात रूपांतर होऊन खाली येणे गरजेचे असतें परंतु सांद्रीभवन कमी उंचीवर झाल्यामुळे हवेच्या घर्षणाचा कालावधी त्यांना उंची कमी पडत असल्यामुळे कमी पडतो. त्यामुळे उंचीचे अंतर कमी झाल्या मुळे हवेच्या घर्षणाची शक्ती अपुरी पडल्यामुळे त्याचे पावसाच्या थेंबात पुर्ण रूपांतर न झाल्यामुळे पावसाच्या थेंबा बरोबर लहान मोठे बर्फाचे गोल तुकडेही घर्षणाने बारीक गोलाकार होवून (जसे नर्मदा नदीच्या पात्रात जसे दगडाचे रूपांतर पाण्याच्या अति प्रवाहाच्या घर्षणाने गोटे तयार होतात) तसे खाली येतात. त्यालाच आपण गारा म्हणतो. अति प्रमाणात झाल्यास त्यालाच आपण गारपीट म्हणतो. हीं उत्तर भारतात जास्त होते.
ज्या वाऱ्यांना इंग्रजीत ‘ ईस्टर्लिज ‘ हिंदीत ‘पुरबी’, मराठीत ‘पूर्वेकडून वाहणारे (व्यापारी वारे ) कि जे नेहमीच पूर्वेकडून पश्चिमकडे वाहतात, विषववृत्तच्या उत्तरेकडील भागात प्रचंड बाष्प बंगालच्या उपसागराहून भारतीय द्वीप कल्पात (दक्षिण भारत )हवेच्या निम्न पातळीवरून आणुन ओतत असतात. ह्याच वेळेस साधारण २६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान देशातून पूर्णपणे परतून गेलेला नेरुक्त मान्सुन पण तो फक्त तामिळनाडू (मद्रास) मधे थबकलेला (साधारण ३ महिने) ईशान्य मान्सुनहीं निघून जाण्याच्या तयारीत असतो. आणि ह्याच कालावधीत जोडीला उत्तर भारतातही पश्चिमी प्रकोपही जोरावर असतात. ह्या दोघांच्या एकत्रित परिणाममुळे संपूर्ण उत्तर व मध्य भारतात महाराष्ट्रापर्यंत २५ ते ४५ दिवस गारपिटीचा काळ मानला जातो.
https://twitter.com/anusha_puppala/status/1636321936736391169?s=20
गारपीटीचा कालावधी आपल्यासाठी २६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी जाणवतो. परंतु त्याचा कालावधी तेथे न संपता कालावधी मार्च अखेर पर्यंत किंवा कधी एप्रिल उजाडला तरी गारपीटचे सावट जाणवते. परंतु ह्या कालावधीतील घडून येणारी गारपीटीची प्रक्रिया वेगळी असते, कि जी सध्या आपण अनुभवत आहोत, ती प्रक्रिया खालील प्रमाणे घडून येते.
पूर्व मोसमी (मार्च ते मे ) Pre-monsoon season, हंगामात जेंव्हा दोन प्रति -चक्री वादळे, अथवा प्रति-विवर्ते (Anticyclones) किंवा उच्च हवेच्या दाबाचे डोंगर एक अरबी समुद्रात तर दुसरे बंगालच्या उप सागरात किंवा किनारपट्टीच्या भू भागावर तयार होतात तेंव्हा ह्या दोघांच्या मधे वाऱ्याची विसंगती (discontinuity of wind) तयार होते. म्हणजेच वारे एकमेकांच्या विरुद्ध महाराष्ट्रात तसेच देशाच्या मध्यावर वाहू लागतात. अरबी समुद्राच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे तर बं. उ. सागरबाजूला दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात. त्यामुळे समुद्रावरील बाष्प आक्रमण भू-भागावर होऊन गारपीट होते.
https://twitter.com/jsuryareddy/status/1637147849069846529?s=20
चक्री वादळ (Cyclone)म्हणजे हवेच्या अति कमी दाबाची घळ (दरी) कि ज्यात वारे घड्याळ काट्याच्या विरुद्ध दिशेने गोलाकार पद्धतीने वर्तुळाच्या मध्य बिंदूकडे येतात. तर प्रति चक्री वादळ (Anti -cyclone) म्हणजे हवेच्या दाबाचा उंच डोंगर होय, कि ज्यात वारे घड्याळ काट्याच्या दिशेने गोलाकार पद्धतीने वर्तुळाच्या मध्य बिंदूकडून बाहेर फेकले जातात.
कधी-कधी वीजा व गडगडाट या वातावरणीय घटनेची अति तीव्रता झाल्यासही गारपीट होते. देशात सगळ्यात जास्त गारपीट महाराष्ट्रात होते. त्यातही जास्त उत्तर विदर्भात अधिक होते.
Special Article on Hailstorm Climate Weather by Manikrao Khule