सोमवार, ऑक्टोबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अफ्रिकेच्या सरकारपासून अनेक ठिकाणी होते गुप्ता बंधूंचे वर्चस्व; भारतात चालवायचे रेशन दुकान

जून 16, 2022 | 5:31 am
in राष्ट्रीय
0
gupta brothers

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तीचे अचानक नशीब पालटले तर तो अगदी उच्च पदावर जाऊन पोहोचतो किंवा एखाद्या सर्वोच्च शिखरावर क्षेत्राचे नेतृत्व देखील करण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये निर्माण होते, असे म्हटले जाते. भारतीय मनुष्याच्या कार्यकर्तृत्वाचा बद्दल नेहमीच अभिमान आणि गौरवाने बोलले जाते. कारण जगातील अनेक देशांमध्ये भारतीय व्यक्तींनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. सध्या जगभर चर्चा आहे ती गुप्ता बंधूंची. त्यांना सध्या अफ्रिकेत अटक करण्यात आली आहे. हे गुप्ता बंधू नेमके कोण हे आता आपण जाणून घेणार आहोत.

अगदी अमेरिका आणि इंग्लंड सारख्या देशात केवळ उद्योग क्षेत्रात नव्हे तर राजकारणात आणि प्रशासनात ही भारतीय व्यक्ती कार्यरत असल्याचे दिसून येतात. अशाच प्रकारे भारतातील कुटुंबातील तिघे बंधू यांनी दक्षिण आफ्रिकेतील राजकारणात आपला ठसा उमटविला होता. अप्रत्यक्षपणे ठसा उमटविला होता, जणू काही एकेकाळी राजकारणाची सूत्रे त्यांच्या हातात होती. असे म्हटले जाते, परंतु त्यानंतर अनेक वाद देखील उद्भवले.

एक काळ असा जेव्हा संपूर्ण दक्षिण आफ्रिकेचे राजकारण तीन भावांभोवती फिरत होते. त्याच्या प्रभावामुळे दक्षिण आफ्रिकेच्या राजकारणात उलथापालथ झाली आणि अध्यक्ष जेकब झुमा यांना पायउतार होण्यास भाग पाडले. जेकब झुमा यांच्यामार्फत त्यांना सोन्याच्या खाणींसह सर्व सरकारी कंत्राटे मिळविल्याचा आरोप आहे. सरकारी कामातही ढवळाढवळ करू लागली.

अजय गुप्ता, अतुल गुप्ता आणि राजेश गुप्ता यांचे वडील शिवकुमार गुप्ता यांचे सहारनपूरमध्ये छोटेसे रेशनचे दुकान होते. अजयने सीए, तर अतुलने बीएससी, कॉम्प्युटर हार्डवेअर व असेंब्ली कोर्स केला. धाकटा भाऊ राजेश याने बी.एस्सी केले, 1985 मध्ये ते सहारनपूरहून दिल्लीला आले आणि तिथे एका मोठ्या हॉटेलमध्ये काही दिवस काम केले. त्यानंतर नोकरी सोडून 1993 मध्ये दक्षिण आफ्रिकेत राहायला गेले. येथे तिन्ही भावांनी संगणकाशी संबंधित व्यवसाय सुरू केला आणि दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे संगणक आणि त्याचे पार्ट्स बनवण्यासाठी कंपनी सुरू केली. यादरम्यान अजयचे दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी कौटुंबिक संबंध होते.

दक्षिण आफ्रिकेच्या अर्थमंत्र्यांना हटवल्याचा आरोप झाल्यावर अजय वादात सापडला. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी त्यांच्या सांगण्यावरून अर्थमंत्र्यांना हटवल्याचा आरोप करण्यात आला. यापूर्वी 2010 मध्ये एका खासदाराला मंत्री करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. अध्यक्ष झुमा यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य अजय गुप्ता यांच्या कंपन्यांमध्ये संचालक होते. दक्षिण आफ्रिकेत, संगणकाव्यतिरिक्त, अजय गुप्ता खाणकाम आणि मीडिया यासारख्या इतर क्षेत्रांमध्ये गुंतलेला आहे.

दक्षिण आफ्रिकेत या 9 वर्षाच्या कालावधीत प्रचंड भ्रष्टाचार झाला राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनाही भ्रष्टाचारामुळे आपले पद गमवावे लागले होते. गुप्ता बंधू अजय, अतुल आणि राजेश गुप्ता यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या स्थानिक चलनाचा मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. हा भ्रष्टाचार 2009 ते 2018 दरम्यान झाला होता. मात्र, घोटाळे उघड झाल्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेतून पळून गेला. त्याच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शनेही झाली. आता दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी सर्वप्रथम कबूल केले की गुप्ता कुटुंबावर योग्य कारवाई झाली नाही.

सन 1993 मध्ये गुप्ता बंधू दक्षिण आफ्रिकेत पोहोचले. तेथे त्यांनी चपलांच्या दुकानाचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्याचा व्यवसाय वाढू लागला. यानंतर गुप्ता बंधूंनी सहारा कॉम्प्युटर्स नावाची कंपनी स्थापन करून पहिले मोठे पाऊल उचलले. यानंतर आयटीपासून मीडिया, खाणकाम आणि रिअल इस्टेटपर्यंत गुप्ता बंधू रमले. 2016 मध्ये, अतुल गुप्ताची एकूण संपत्ती 773.47 दशलक्ष डॉलर्स झाली आणि ते दक्षिण आफ्रिकेतील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले.

एप्रिल 2013 मध्ये गुप्ता कुटुंब पहिल्यांदा वादात सापडले होते, कारण कौटुंबिक विवाह समारंभासाठी भारतातून आलेले त्यांचे पाहुणे विमान दक्षिण आफ्रिकेच्या हवाई दलाच्या तळावर उतरले होते. या विशेष कार्यक्रमावर बराच गदारोळ झाला आणि त्यावर राजकीय वर्तुळात टीकाही झाली. त्यानंतर गुप्ता कुटुंबाने याबद्दल माफी मागितली आणि दक्षिण आफ्रिकेत पर्यटनाला चालना द्यायची असल्याचे सांगितले. मात्र ही घटना गुप्तागेट या नावाने प्रसिद्ध होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावधान! हॉर्न वाजवाल तर होईल तब्बल १२ हजारांचा दंड; कसा? घ्या जाणून

Next Post

वेळीच ओळखा निसर्गाचा धोक्याचा इशारा; दरड कोसळण्याच्या आपत्तीला असे ओळखा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Diwali22
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – जगभर अशी साजरी होते दिवाळी! देशोदेशी अशा आहेत विविध प्रथा

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 19, 2025
indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
1002689727
मुख्य बातमी

निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तरं देतायेत? राज ठाकरे कडाडले

ऑक्टोबर 19, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

उद्या आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 19, 2025
narak chaturdashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे नरक चतुर्दशी – असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 19, 2025
IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
Next Post
darad landslide

वेळीच ओळखा निसर्गाचा धोक्याचा इशारा; दरड कोसळण्याच्या आपत्तीला असे ओळखा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011