शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सगळीकडे नुसताच गोंगाट… या ध्वनी प्रदूषणाचे करायचे तरी काय? यावर उपाय काय आहे?

जानेवारी 2, 2023 | 9:43 pm
in इतर
0
Noise Pollution

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– आपलं पर्यावरण –
ध्वनिप्रदूषणाचा भस्मासूर

भर रस्त्यात ट्राफिक जाम झाल्यावर प्रत्येक गाडीतून वाजवल्या जाणाऱ्या हाॅर्नच्या कर्णकर्कश्श आवाजाने डोके ठणकल्याचा अनुभव गाठीशी आहे? विमानतळाच्या सभोवताल राहणाऱ्या नागरिकांना विचारा, विमान उतरल्यावर किंवा ते उडताना होणाऱ्या आवाजाची मजा येते की त्रास होतो? एखाद्या लोकवस्तीजवळ असलेल्या एखाद्या कारखान्यातून दिवसरात्र लोखंड लोखंडावर आपटण्याचे आवाज होत असतील तर? अहो, इतकंच कशाला ऐन झोपेच्या वेळी शेजारच्या घरातून झोपेचे खोबरे करणारा मिक्सर ग्राईंडरचा आवाज कानावर आदळला, घरातल्या तान्ह्या बाळाचे रडणे सुरू झाले, गल्लीत खेळणाऱ्या मुलांचा गोंगाट सुरू झाला, कोणीतरी मोठ्या आवाजात त्यांना आवडणारी पण तुम्हाला याक्षणी अजिबात ऐकण्याची इच्छा नसलेली गाणी सुरु केली, भल्या मोठ्या आवाजात टीव्ही सुरू केला, शेजारच्या लग्नघरी संगीत समारंभात हृदयाचे ठोके वाढविणारा डीजे सुरू झाला, तर…? अशावेळी तर घरातल्या कुकरच्या शिट्ट्यांचा आवाजही नकोसा वाटतो. मग इतर आवाज हवेसे कसे वाटणार?

Dr Pravin Mahajan
डॉ. प्रवीण महाजन
जल अभ्यासक
मोबाईल – 9822380111

घराघरातल्या कुलरच्या आवाजापासून तर रेल्वे स्थानकावरील ध्वनिक्षेपकांवरून सतत दिल्या जाणाऱ्या सूचना-घोषणांच्या आवाजापर्यंत, साऱ्याच नकोशा अशा आवाजांबाबत गांभिर्याने विचार केला आहे कधी कुणी? करायला हवा ना! छोट्या छोट्या गोष्टींमधून किती ध्वनिप्रदूषण करतो आपण ? सवयीचा भाग झाल्याने, किंवा रोजचाच दिनक्रम झाल्याने, कूकरच्या शिट्ट्यांमुळेही ध्वनिप्रदूषण होते, ही बाब ध्यानातही येत नाही कोणाच्याच. पण कल्पना करा, देशभरातील अरबोंच्या संख्येतील घरांमध्ये दररोज सकाळ -संध्याकाळ कूकरच्या शिट्ट्या वाजतात. कोट्यवधी वाहने, शेकडो विमाने, हजारो रेल्वे गाड्या, जिथे गाड्यांबाबत सतत उद्घोषणा होतात अशी लाखभर रेल्वे स्थानकं…..केवढा आवाज, केवढे ध्वनिप्रदूषण?

वाढते शहरीकरण, पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीचे बांधकाम, वाहतूक, औद्योगिक कार्य, खाणींमध्ये होणारा सुरूंग स्फोट या प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे मानवी समूह प्रामुख्याने प्रभावीत होतो. झोपमोड होणे, ऐकण्यास त्रास होणे, संवाद साधताना अडचण निर्माण होणे आदी परिणाम तर आहेतच. पण ध्वनिप्रदूषणाने फक्त माणसंच प्रभावीत होतात असे मात्र नाही. संजीव, निर्जीव सर्वांनाच त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. फटाके फुटायला लागले की कुत्रे-मांजरी कसे दचकतात, भितात एकदा बघाच. पक्षी, इतर प्राणी, मासे यांच्यावरही ध्वनिप्रदूषणाचे परिणाम होतात, हे अभ्यासकांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. पण मानवी वर्तनात त्याने काही फरक पडल्याचा निष्कर्ष मात्र अद्याप कुणाला काढता आलेला नाही. कारण मुळातच तो फरक पडलेला नाही. माणसं, प्राणी, पक्षांव्यतिरीक्त झाडं आणि निर्जीव वस्तूंवरही ध्वनिप्रदूषणाचा दुष्परिणाम होतो. कोळसा, दगड काढण्यासाठी घडविल्या जाणाऱ्या स्फोटांचे आवाज आणि ध्वनी लहरींमुळे परिसरातील घरांच्या भिंतींना तडे जातात, खिडक्यांची तावदाने फुटतात, हे तर आपल्याला ठावूक आहे, पण किल्ले व अन्य ऐतिहासिक वास्तूंवरही त्याचे परिणाम होतात. इतकेच काय, मोठमोठ्या पहाडावर, पर्वतांनाही ध्वनिप्रदूषणाच्या परिणामस्वरूप भेगा पडतात. कल्पना करा, पर्वतांना हादरविण्याची ताकद असलेल्या या प्रदूषणामुळे सजीवांवर काय आणि कसे परिणाम होत असतील?

टेक्सटाइल मिल, प्रिंटिंग प्रेस, मेटलची कामे होतात त्या कारखान्यातला आवाज, धार्मिक स्थळांवरचे भोंगे, शेतीसाठी वापरली जाणारी अवजारे, ट्रॅक्टर्स, थ्रेटर्स, हार्वेस्टर्स आदी बाबींची भर आहेच. एकट्या अमेरिकेत निदान तीन कोटी लोक श्रवण क्षमता गमावून बसले आहेत. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, युके मधील देशातही कर्णबधीरतेचे प्रमाण सतत वाढत असून, सतत ईअर फोन वापरणाऱ्या नव्या पिढीत ते प्रमाण अधिक असल्याने दिसून येत आहे. रस्त्यांवरून धावणाऱ्या गाड्या आणि आकाशात उडणारी विमाने, यांचा आवाज सर्वाधिक त्रासदायक ठरतो आहे. काही देशांमध्ये ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियम तयार होताहेत. अर्थात त्या नियमांची अंमलबजावणी देखील होते आहे. पण भारतात ना कायदेशीर व्यवस्था आहे, ना त्याच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा मजबूत आहे.

धार्मिक स्थळांवरील भोंगे हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरत असेल तर कोण काय करणार? तामिळनाडू मधील चेन्नईतील केकेआर मॅजेस्टिक काॅलनीमधील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी होणाऱ्या ध्वनिक्षेपकाच्या वापराविरुद्ध काॅलनीतील लोकांनी केलेल्या तक्रारी आणि तेथील उच्च न्यायालयात दाखल केलेले प्रकरण यापूर्वी बरेच गाजले आहे. नाही म्हणायला भारतात काही कायदेशीर तरतुदी आहेत. उदाहरणार्थ, ॲप्रोप्रिएट टू डीड मधील आर्टिकल 21 ने लोकांचा एकांतात, शांततेत जीवन जगण्याचा अधिकार मान्य केला आहे. क्रिमीनल प्रोसीजर कोड 1973 च्या 133 सेक्शन नुसार ध्वनिप्रदूषणावरील नियंत्रण मान्य करण्यात आले आहे. फॅक्टरी ॲक्ट मधील तिसऱ्या शेड्युल मधील सेक्शन 89 आणि 90 नुसार मानवी आरोग्यावर परिणाम होईल, विशेषतः लोकांच्या श्रवण क्षमतेवर परिणाम होईल अशा आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजण्याची जबाबदारी संबंधित उद्योग मालकाची आहे. याशिवाय मोटर व्हेईकल ॲक्ट, एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1996, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कायदे आहेत, पण त्यांच्या अंमलबजावणीची स्थिती, पद्धत आणि परिणाम सर्वांसमोर आहेत.

अधिक आवाज करणाऱ्या कारखान्यांना रहिवासी क्षेत्रात परवानगी नाकारणे, विमानांना आपत्कालीन परिस्थितीव्यतिरीक्त एका मर्यादेपेक्षा कमी उंचीखाली विमान उडविण्यास मनाई करणे, शाळा, महाविद्यालये, दवाखान्यांप्रमाणेच सायलेंट झोन अधिक प्रमाणात वाढवणे, विमानतळावर होऊ लागलाय तसा विना उद्घोषणा कार्य करण्याचा प्रयोग रेल्वे स्थानकावर शक्य होईल कां, हे तपासून बघणे, असेही काही उपाय आहेत. तसाही, गाड्यांमागील निर्जीव बोर्डांवरील हाॅर्न प्लीज चा प्रवास नो हाॅर्न प्लीज पर्यंत झालाच आहे. आता सजीवांचा प्रवास तिथवर केव्हा होतो, तेवढे बघायचे!

डॉ. प्रवीण महाजन,
जल अभ्यासक,
डॅा. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कारार्थी
महाराष्ट्र शासन मो. 9822380111
email: [email protected]
Sound Pollution Problem Solutions by Dr Pravin Mahajan
Column Special Article India Darpan

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा; यंदाचे हे आहे आकर्षण, बघा, सर्व नियोजित कार्यक्रमांची यादी

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३ जानेवारी २०२३

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
Happy birthday

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - मंगळवार - ३ जानेवारी २०२३

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011