इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोनीचा स्मार्ट टीव्ही मिळवण्याची उत्तम संधी आली आहे. Amazon India वर ३९% सूट देऊन ५५ इंच Sony Bravia 4K Ultra HD Smart LED Google TV (KD-55X74K) खरेदी करू शकता. कंपनीच्या या 4K टीव्हीची MRP ९९ हजार ९०० रुपये आहे. सेलमधील या सवलतीनंतर, हा टीव्ही ६०,९९९ रुपयांमध्ये मिळू शकतो. खास गोष्ट म्हणजे ऑफरमध्ये कंपनी सर्व बँक कार्ड्सवर २५०० रुपयांची सूटही देत आहे. याशिवाय तुम्ही Axis किंवा RBL बँक कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला १५०० रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. या सर्व ऑफर्ससह, टीव्हीवर एकूण सवलत ४२,९०१ रुपये झाली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही हा टीव्ही ९९,९०० रुपयांऐवजी ५६,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.
टीव्हीची वैशिष्ट्ये
टीव्हीमध्ये, कंपनी 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह ५५ इंचाचा 4K डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटसह आणि १७८ डिग्रीच्या व्ह्यूइंग अँगलसह येतो. उत्कृष्ट चित्र गुणवत्तेसाठी, कंपनी या टीव्हीमध्ये लाइव्ह कलरसह 4K X Reality Pro, X1 4K प्रोसेसर आणि 4K HDR देखील देत आहे. याशिवाय तुम्हाला त्यात Motion Flow XR100 देखील मिळेल.
मजबूत आवाजासाठी, टीव्हीमध्ये २० वॅट्सच्या ध्वनी आउटपुटसह एक ओपन बॅफल स्पीकर आहे. टीव्हीचा आवाज अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी त्यात डॉल्बी ऑडिओ सपोर्टही दिला जात आहे. कंपनी Google TV OS वर काम करणार्या या टीव्हीमध्ये अंगभूत Chromecast देखील देत आहे.
याशिवाय तुम्हाला नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ देखील मिळतील. कनेक्टिव्हिटीसाठी, 3HDMI पोर्ट आणि दोन यूएसबी पोर्टसह टीव्हीमध्ये सर्व मानक पर्याय देण्यात आले आहेत. या Sony TV मध्ये तुम्हाला Apple Airplay, Apple HomeKit आणि Alexa देखील मिळेल.
Sony Bravia 4K Ultra HD Smart LED TV Bumper Offer