शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इगतपुरीसह या ४ रेल्वे स्टेशनवर सुरू होणार ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’; ग्राहकांना मिळणार ही सुविधा

by India Darpan
ऑक्टोबर 27, 2022 | 5:09 am
in संमिश्र वार्ता
0
Restuarant on Wheel

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य रेल्वेने ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईमध्ये तर फेब्रुवारी २०२२ मध्ये नागपुरला‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू केले आहे. नुकताच या‘रेस्टॉरंट ऑन व्हील’चा आढावा घेण्यात आला असून मुंबईच्या तुलनेत नागपूरच्या रेस्टॉरंट ऑन व्हीलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. मध्य रेल्वेने तिकीट भाडेशिवाय महसूल योजनेअंतर्गत हा प्रकल्प सुरू केला असून येत्या काही दिवसात आकुर्डी, चिंचवड, मिरज आणि बारामती या चार स्थानकांवर रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू करणार आहे.

३ फेब्रुवारी २०२२ रोजी नागपूर येथे दुसरे रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू करण्यात आले. नागपूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर रुळांवर रेल्वेच्या एका डब्यात हे रेस्टॉरंट उभारण्यात आले आहे. येथे रेल्वे कोचचा हुबेहूब देखावा सादर करण्यात आला आहे. डबा सुशोभीत करताना नागपूर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांचा विचार करण्यात आला आहे. तसेच डब्याचा मूळ रंग आणि रचना कायम ठेवण्यात आली आहे. या रेस्टॉरंटमध्ये १० टेबल आणि ४० ग्राहक सामावू शकतात. आजपर्यंत अंदाजे १ लाख ५० हजार पर्यटक येथे आले आहेत.

मध्य रेल्वेवर असेच प्रकल्प उभारण्यासाठी ७ ठिकाणे निश्चित केली आहेत. मध्य रेल्वेकडून मुंबईत १८ ऑक्टोबर २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहिले ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू करण्यात आले होते. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेला रेल्वेचा डबा वापरून बनवण्यात आले आहे. रेस्टॉरंटच्या आतील भागात रेल्वे-थीमद्वारे भिंतीवर रेल्वेची ऐतिहासिक माहिती देण्यात आली आहे. त्याला बोगी-वोगी असे नाव देण्यात आले आहे. या रेस्टॉरंटमध्ये १० टेबल असून ४० ग्राहक जेवण करू शकतात. आजपर्यंत अंदाजे १ लाख २५ हजार ग्राहकांनी येथे जेवणाचा आनंद घेतला आहे.

मध्य रेल्वेने आकुर्डी, चिंचवड, मिरज आणि बारामती या चार स्थानकांवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, लोणावळा, नेरळ, इगतपुरी, दादर आणि माथेरान अशा ७ ठिकाणी ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे असे मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे.

Igatpuri Railway Station Restaurant on Wheels

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

T20 World Cup- भारतीय संघ सेमी फायनलपर्यंत जाणार का?

Next Post

सोनीचा तब्बल १ लाखाचा स्मार्ट टीव्ही अवघ्या ५६ हजार रुपयात; नक्की विचार करा

Next Post
Sony Bravia 4K Ultra HD Smart LED TV e1666790302397

सोनीचा तब्बल १ लाखाचा स्मार्ट टीव्ही अवघ्या ५६ हजार रुपयात; नक्की विचार करा

ताज्या बातम्या

GrD PPPacAALypi e1747393097735

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर…उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

मे 16, 2025
1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011