नवी मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विकृती हे कुठल्याही गुन्ह्याचे मूळ आहे. त्यातही अश्लीलता ही विकृतीतूनच जन्माला येते, हे तर सिद्ध झालं आहे. एका तरुणाने लिफ्टमध्ये महिलेपुढे अश्लील चाळे केल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य म्हणजे पोलिसांनी त्यांचं काम केलं, पण या घटनेचा जो व्हिडियो व्हायरल झाला आहे, तो रोखणे आता त्यांना शक्य नाही, हेही तेवढेच खरे.
नवी मुंबईतील मार्बल आर्च या तळोजा हाऊसिंग सोसायटीमधील ही घटना आहे. सोसायटीने लिफ्टमध्ये सीसीटीव्ही लावल्यामुळेच या प्रकरणातील आरोपीला पकडणे शक्य झाले आहे. सीसीटीव्हीत कैद झालेला प्रकार बघता संबंधित तरुण त्याच सोसायटीत राहणारा असावा, हे स्पष्ट होते. आरोपी तरुण व महिला एकाचवेळी लिफ्टने जाताना दिसत आहेत. महिलेकडे बघून हा तरुण अश्लील चाळे करतोय आणि त्यामुळे महिला प्रचंड घाबरलेली आहे. पण लिफ्ट थांबेपर्यंत ती काहीच करू शकत नव्हती. मुख्य म्हणजे लिफ्ट थांबल्यावरही काही सेकंद तो तरुण महिलेकडे बघत राहिला आणि त्यानंतर बाहेर पडला. तरुण बाहेर पडल्यानंतर घाबरलेल्या महिलेला काहीच सूचत नव्हते. हे सारं सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
https://twitter.com/SabSeTezz1/status/1612296584246755328?s=20&t=ljv2aMkQP_EBJ-tpIyaKiw
ट्वीटमुळे कळले
कार्यकर्त्या बीनू वर्गीस यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती पोलिसांना दिली. ‘लिफ्टमध्ये एका तरुणाने महिलेसोबत गैरवर्तन केले. नवी मुंबईतील मार्बल आर्च मधील ही घटना आहे’, असं ट्वीट त्यांनी केलं. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर त्याची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध घेतला. व्हिडियोच्या आधारानेच पोलिसांनी आरोपीलाही अटक केली आहे. तातडीने कारवाई झाल्यामुळे पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
Society Lift Youth Sexual Harassments Women CCTV Video Viral