नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या समाज कल्याण विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतीगृह योजनेबाबत विद्यार्थ्यांकडून सोयी सुविधांबाबत तक्रारी केल्या जातात, प्रश्न उपस्थित केले जातात, याबाबत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी संवाद कार्यक्रम हा अभिनव उपक्रम राबविण्यात निर्णय घेतला आहे..
याच संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सर्व अधिकारी यानी थेट विद्यार्थ्यांसोबतच दिनांक २७ व दिनांक २८ रोजी येथील शासकीय वसतीगृहात रात्रभर मुक्काम ठोकून विद्यार्थ्यांची संवाद साधला आहे. या उपक्रमाचे विद्यार्थ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले असून राज्यात प्रथमच अशा प्रकारे एखाद्या विभागाचा प्रमुख वसतीगृहात रात्रभर मुक्काम करण्याची घटना घडली आहे. या संवाद उपक्रमामुळे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देखील सुखद धक्का बसला आहे. आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी देखील पुणे येथील वसतिग़ृहात मुक्कम करुन स्वतः विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या सुविधा जेवण व विद्यार्थ्यां मार्फत राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत माहिती जाणून घेतली.
नाशिक विभागातील समाज कल्याण विभागाचे सर्वच सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी यांनी त्या त्या जिल्ह्यात शासकीय वसतिगृहात मुक्काम ठोकला आहे. व यापुढेही प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांबरोबर मुक्काम करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्याबाबत आयुक्त यांनी ऑनलाइन बैठक घेऊनच दि २७ रोजी त्या संदर्भात निर्देश दिले होते.
संवाद उपक्रमांतर्गत प्रादेशिक उपायुक्त डॉ.भगवान वीर यानी अहमदनगर जिल्हातील शेवगाव येथील वसतिगृहात मुक्काम करून विद्यार्थ्यांबरोबर वेळ घालवला. तर नाशिकचे सहायक आयुक्त श्री सुंदरसिंग वसावे यांनी आडगाव नाका परिसरातील शासकिय वसतिगृह युनिट क्र १ येथे तर समाज कल्याण अधिकारी श्रीमती हर्षदा बडगुजर यांनी नाशिक येथील १२५ वर्षा निमित्त उभारण्यात आलेल्या मुलीची शासकिय वसतिगृहात मुक्कम केला आहे. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांना मिळणारे जेवण देखील या सर्व अधिकारी यांनी सोबत केले.
समाज कल्याण आयुक्त यांच्या संवाद कार्यक्रम संकल्पनेने विद्यार्थी देखील भारावून गेले. विद्यार्थ्यांना देखील अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा यावे अधिकारी यांच्याबरोबर केल्यात. यावेळी त्यांनी वसतिगृह गृहप्रमुख व गृहपाल यांना वसतीगृहात निवास करणे बाबत सक्त ताकीद दिली. व तक्रारी प्राप्त झाल्यास सक्त कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी दिले. विद्यार्थ्यांच्या सूचना व मागणीनुसार त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी कौशल्य विकास कार्यक्रम तसेच विविध तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करणे बाबत देखील निर्देश यावेळी देण्यात आलेत.
Social Welfare Department Officers Night Stay at Hostel