इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्नकार्य म्हटले की, नातेवाईक, वऱ्हाडी यांचा मानपान हा ओघाने आलाच. जरादेखील कमी-जास्त झाले तर रुसवे-फुगवे यांनी मंगल सोहळा गाजत असतो. मात्र, नवरदेवाच्या काकांना जेवणात मटार-पनीर न मिळाल्यामुळे रुसव्या-फुगव्यांची मर्यादा ओलांडत पार लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार उत्तर प्रदेशच्या बागपत येथे घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पनीरसाठी फ्रीस्टाइल भांडणारे वऱ्हाडी नेटीझन्समध्ये चर्चेचा विषय ठरताहेत.
आदित्य भारद्वाज या ट्विटर युजरने ९ फेब्रुवारी रोजी या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला होता. ही घटना उत्तर प्रदेशातील बागपत येथील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अन्य लग्न समारंभाप्रमाणे येथेदेखील सर्व काही व्यवस्थित सुरू होते. कोणत्याही लग्न समारंभात जेवण ही गोष्ट फार महत्त्वाची असते. मुलाच्या काकांना पनीर न दिल्याने वाद झाला. दोन्ही बाजूचे लोक एकमेकांशी भिडले. हे भांडण फक्त तोंडी नाही तर थेट मारहाणीपर्यंत गेले. हाणामारी एवढी जोरदार होती की काही लोकांचे कपडेही फाटले.
पोलिसांना करावे लागले पाचारण
काही जणांनी हस्तक्षेप करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही थांबत नव्हते. काही वेळातच लग्नाचे वातावरण रणांगणात बदलले. हा गोंधळ थांबवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही बाजूंच्या लोकांना ताब्यातही घेण्यात आले आहे.
https://twitter.com/ImAdiYogi/status/1623610976108183552?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1623610976108183552%7Ctwgr%5Edab97a280c5643c794f2279c3175d72fa41c4ef6%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fsocial-viral%2Fgroom-fufa-did-not-get-matar-paneer-in-wedding-so-there-was-ruckus-hit-everyone-guests-fight-up-video-a597%2F
Social Viral Video Marriage Fight Paneer Police