इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम दलजित कौर सध्या बरीच चर्चेत आहे. ‘बिग बॉस १६’चा स्पर्धक शालीन भानोतची आधीची पत्नी दलजित दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मार्च २०२३ मध्ये दलजित युकेतील बिझनेसमन निखिल पटेलशी लग्नगाठ बांधणार आहे. जानेवारी महिन्यात या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला. निखिलचंही हे दुसरं लग्न आहे. आता दलजितने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती इंटिमेट झालेली दिसत आहे.
दलजित कौर ही सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. त्यामुळेच आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी ती आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते. दलजितने तिच्या इन्स्टाग्रामवर वुड बी हबी निखिलसोबतचा एक व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं, “मी सध्या आफ्रिकेतील केनिया येथे आहे. तुम्ही सर्वांनी या आठवड्यात माझ्या आणि निखिलच्या साखरपुड्याची बातमी वाचलीच असेल, याची मला खात्री आहे. आमच्या दोघांच्याही आयुष्यातील हा नवा अध्याय आहे. ज्याला आम्ही “टेक २” म्हणतो. अखेर… आमचं आयुष्य बदलणार आहे. २० वर्षे मुंबईत राहून माझे करिअर केल्यानंतर आता मी केनिया, आफ्रिकेत स्थायिक होत आहे. मी कधीच भारताबाहेर गेले नाही. त्यामुळेच मी खूप उत्साही आहे. माझ्या मुलाच्या जेडनच्या शाळेपासून ते माझ्या करिअरपर्यंत… आता सर्व काही बदलणार आहे.”
दलजीत म्हणते, “मी आणि निखिलने ठरवलं आहे की, आमचा हा सगळं प्रवास तुमच्या साक्षीने व्हावा. खरं तर माझं बॉलीवूड करिअर आणि माझ्या भावी पतीला हिंदी येत नसल्याने, सगळं कसं सांभाळायचं, असा प्रश्न पडला आहे. “आम्ही पहिल्यांदा दुबईत भेटलो.” दलजितने शेअर केलेल्या या व्हिडिओत दोघांमधील जवळीक स्पष्ट दिसत असून दोघेही किस करताना दिसत आहेत.
अर्जुन बिजलानीने दलजीत कौरच्या व्हिडिओवर कमेंट करत तिच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दलजीत कौरचं हे दुसरं लग्न आहे. तिचं पहिलं लग्न ‘बिग बॉस १६’चा स्पर्धक शालीन भानोतशी लग्न केलं होतं. पण २०१४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. दोघांनाही एक मुलगा आहे. जो घटस्फोटानंतर दिलजीतसोबत राहतो.
https://www.instagram.com/reel/CoY2d-cIfJ5/?utm_source=ig_embed&ig_rid=a0619bd9-5e72-4098-aea7-bef3f33d0a16
Daljiet Kaur Second Wedding Boyfriend Video