नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसामान्य रुग्णांना मोफत आणि परवडतील अशा दरांत जागतिक दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्यात एसएमबीटी हॉस्पिटलला यश आले आहे. यंदाच्या आरोग्यसाधना शिबिरास राज्यातील अनेक भागातून आलेल्या रुग्णांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. गेल्या तीन महिन्यांत तब्बल पन्नास हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात हॉस्पिटलच्या तज्ञांना यश आले. तर चार हजार पेक्षा अधिक जटील शस्रक्रियादेखील या शिबिराअंतर्गत करण्यात आल्या. यामध्ये शासकीय योजनेत झालेल्या शस्रक्रियांचा आकडा मोठा आहे. तसेच योजनेत न बसणाऱ्या शस्रक्रियादेखील अल्पदरांत असल्यामुळे हजारो रुग्णांना या विशेष सवलतीला लाभ मिळाला. रुग्णांचा वाढता प्रतिसाद यामुळे हॉस्पिटलकडून या शिबिराला महिनाभर मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली.
कमीत-कमी दरांत उत्तम आरोग्यसुविधा पोहचविण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे व नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एसएमबीटी हॉस्पिटल कायम वचनबद्ध राहिले आहे. प्रत्येक व्यक्तीला आरोग्यदायी जीवन जगता यावे. तसेच कुठलीही व्यक्ती आर्थिक अडचणीमुळे आरोग्यसेवा, सुविधा यापासून वंचित राहू नये, हाच एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित आरोग्यसाधना शिबीराचा मुख्य उद्देश आहे. हॉस्पिटलच्या वतीने १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत आरोग्यसाधना शिबीर सुरु करण्यात आले होते. या शिबिराअंतर्गत विविध उपचार मोफत आणि सवलतीच्या दरांत करण्यात आले. गेल्या तीन महिन्यात या शिबीराचा ५० हजारांहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. आरोग्यसाधना शिबिरात रुग्णांच्या सर्व आजारांची तपासणी, उपचार आणि विविध शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या अंतर्गत उपचार व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत आहेत. तसेच योजनेत समाविष्ट नसलेल्या शस्त्रक्रिया करण्यासाठी इतर ठिकाणी मोठा खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्य रुग्णांना परवडण्यासारखा नसतो. त्यावेळी रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांची उपचार, शस्त्रक्रिया यासाठी पैसे जमवताना मोठी धावपळ होते. शासकीय योजनेत समाविष्ट नसलेल्या विविध शस्त्रक्रिया आरोग्यसाधना शिबीरात परवडणाऱ्या दरात करण्यात आल्या.
हृदयरोग व हृदयविकार, बालरोग व बालहृदयरोग, कर्करोग, किडनीविकार, मुत्रविकार, मेंदू व मणकेविकार, सांधेरोपण गुडघा व खुबा प्रत्यारोपण, क्रिटिकल केअर मेडिसीन, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी, परैलिसिस( स्ट्रोक), प्लास्टिक सर्जरी, जन्मजात आजार, अस्थिरोग, बालरोग, नेत्ररोग, दंतरोग, कान, नाक, घसा, त्वचा याबरोबरच गुप्तरोग, श्वसन रोग, मानसोपचार, आहार आणि पोषण, अपघात, फिजिओथेरेपी इत्यादी आजारांच्या उपचारांसाठी मोठ्या संख्येने एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत.
आंतररुग्ण विभागात दहा हजारांपेक्षा अधिक रुग्ण दाखल झाले होते तर १७ सुसज्ज ऑपरेशन थियेटरमध्ये तब्बल चार हजार २५३ रुग्णांवर जटील शस्रक्रिया करण्यात आल्या. तसेच तीनशेहून अधिक अॅन्जिओप्लास्टी, दोनशेहून अधिक बायपास एसएमबीटी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर २४ तास उपलब्ध होते. येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्यासाठी नागपूर, भंडारा, हिंगोली, अमरावती, गोंदिया, जालना औरंगाबाद जिल्ह्यातील मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाले आहे. समृद्धी महामार्गासाठी ठरवून दिलेल्या वेगाचा खऱ्या अर्थाने विदर्भ आणि मराठवाड्यातील रुग्णांना लाभ झाला आहे. विविध सन उत्सवांमुळे अनेक रुग्णांना आरोग्यसाधना शिबिराचा लाभ घेता आला नाही. दर्जेदार आरोग्यासेवांपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी या शिबिरातील सवलती पुढील एक महिनाभर सुरु ठेवण्यात आल्या आहेत.
शिबिरास मुदतवाढ
गेल्या तीन महिन्यात आरोग्यसाधना शिबिराचा लाभ पन्नास हजार पेक्षा अधिक रुग्णांनी घेतला. चार हजार पेक्षा अधिक रुग्णांच्या शस्रक्रिया यादरम्यान झाल्या आहेत. योजनेच्या माध्यमातून मोफत लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी जवळपास आठ हजार पेक्षा अधिक रुग्ण आंतररुग्ण विभागात दाखल झाले होते. रुग्णांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे पुढील काही दिवस या शिबिरास मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रायव्हेट विंगला रुग्णांची पसंती
राज्यातील अनेक भागातील रुग्ण व नातेवाईकांनी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या उपचारावर समाधान व्यक्त करत रुग्णांसाठी आयसीयु व्यतिरिक्त स्वतंत्र बेड उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली होती. दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाकडून अवघ्या एका वर्षांत सुसज्ज २०० बेड्सचे एसएमबीटी केअर प्लस ही प्रायव्हेट विंग सुरु करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद तसेच मराठवाड्यातील अनेक रुग्ण याठिकाणी उपचारार्थ दाखल झालेले आहे.
-सचिन बोरसे, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर
आरोग्यसाधना शिबिराचे आठवे वर्ष
गेल्या आठ वर्षांपासून आरोग्यसाधना शिबिराच्या माध्यमातून अविरत एसएमबीटी हॉस्पिटलकडून रुग्णसेवा केली जात आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लाभार्थी रुग्णांची भर या शिबिरात पडत आहे. मागील तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या आरोग्यासाधना ५० हजारांपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे, तब्बल ८ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतले. तर विक्रमी ४ हजार २५३ रुग्णांवर जटील शस्रक्रिया यादरम्यान झाल्या. रुग्णांच्या आग्रहास्तव हे शिबीर आणखी एक महिना पुढे सुरु ठेवण्यात आले असून जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
डॉ. मीनल मोहगावकर, अधिष्ठाता, एसएमबीटी हॉस्पिटल